Olympic: पी व्ही सिंधूची ‘नॉकआऊट’मध्ये धडक; हाँगकाँगच्या चेंग गँन यीचा केला पराभव

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने टोक्यो ऑलिम्पिकमधील आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत आणखी एका विजयाची नोंद केली. पी. व्ही. सिंधूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरूवात केल्यानंतर महिला एकेरीच्या ग्रुप स्टेज सामन्यात हाँगकाँगच्या चेंयुग गँन यीचा सहज पराभव केला. सिंधूने दोन सेटमध्येच गँन यीचा पराभव केला. सुरूवातीपासूनच सामन्यात बढत घेतलेल्या सिंधूचा हा टोक्यो ऑलिम्पिकमधील दुसरा विजय असून, तिने […]

Tokyo Olympics, Tokyo Olympics 2021, PV Sindhu, Israel, Polikarpova
सिंधूने हाँगकाँगच्या चेंग गँनचा २१-९, २१-१६ असा पराभव केला.

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने टोक्यो ऑलिम्पिकमधील आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत आणखी एका विजयाची नोंद केली. पी. व्ही. सिंधूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरूवात केल्यानंतर महिला एकेरीच्या ग्रुप स्टेज सामन्यात हाँगकाँगच्या चेंयुग गँन यीचा सहज पराभव केला. सिंधूने दोन सेटमध्येच गँन यीचा पराभव केला. सुरूवातीपासूनच सामन्यात बढत घेतलेल्या सिंधूचा हा टोक्यो ऑलिम्पिकमधील दुसरा विजय असून, तिने नॉकआउट फेरीत प्रवेश केला.

रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतही आपल्या कामगिरीत सातत्य ठेवलं आहे. ग्रुप स्टेज मॅचमध्ये इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा पराभव केल्यानंतर सिंधूने ऑलिम्पिक स्पर्धेत दुसऱ्या विजय मिळवला. ग्रुप स्टेजमध्ये पी.व्ही. सिंधूचा हाँगकाँगच्या चेंग गँन यीसोबत सामना झाला. यावेळी सिंधूने जबरदस्त प्रदर्शन करत सुरूवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवली.

पी.व्ही. सिंधूने पहिला सेटमध्ये २१-९ अशा फरकाने आघाडी घेतली. १५ मिनिटं चाललेल्या पहिल्या सेटमध्ये हाँगकाँगच्या गँन यीकडून चुका झाल्या. याचा सिंधूने पुरेपूर फायदा घेत पहिल्याच सेटमध्ये सामना आपल्या बाजूनं फिरवला. दरम्यान, दुसऱ्या सेटमध्ये हाँगकाँगच्या चेंन गँन यीने वापसी केली. त्यामुळे पी.व्ही. सिंधूला तगडी फाईट द्यावी लागली.

दुसऱ्या सेटमध्ये एका क्षणी दोन्ही खेळाडू १४-१४ अशा बरोबरीत होत्या. त्याचवेळी सिंधूने चांगला खेळ करत दुसऱ्या सेटमध्येही आघाडी घेतली. सिंधूने दुसरा सेट २१-१६ अशा फरकाने आपल्या नावे केला. एकूण ३५ मिनिटं चाललेला हा सामना सिंधूने २१-९, २१-१६ अशा फरकाने जिंकला. महिला एकेरीच्या ग्रुप स्टेज सामन्यात सलग दुसरा विजय मिळवत सिंधूने नॉकआउट फेरीत प्रवेश केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tokyo 2020 women single pv sindhu beats hong kong ngan yi cheung bmh

ताज्या बातम्या