Tokyo 2020 : ..अन् सुशील कुमार तिहार तुरुंगामध्ये रवी दहियाचा सामना पाहून रडू लागला

सामना सुरू होण्यापूर्वी सुशील कुमार दुपारपासून टीव्हीसमोर बसून होता

Sushil Kumar watched Ravi Dahiya match from Tihar jail got emotional
रवीला गोल्ड न मिळाल्याने सुशील कुमार भावुक

कुस्तीपटू सागर धनखरच्या हत्येप्रकरणी दिल्लीच्या तिहार कारागृहात बंद असलेला माजी ऑलिम्पियन सुशील कुमार यानी गुरुवारी टोक्यो ऑलिम्पिकमधील रवी दहियाचा सामना टीव्हीवर पाहिला. सामना सुरू होण्यापूर्वी सुशील कुमार दुपारपासून टीव्हीसमोर बसून होता. रवी दहियाची कुस्ती तो क्षणोक्षणी पाहत राहिला. मात्र, रवीला गोल्ड न मिळाल्याने सुशील कुमार भावुक झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू आले.

रवी दहिया सुशील कुमारच्या देखरेखीखाली छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीचे डावपेच शिकत होता. रवी दहिया अंतिम सामन्यात पराभूत झाला. त्याला रशियन पैलवान जावूर युगुईवने ७-४ ने पराभूत केले. अशा प्रकारे रवी दहियाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. रवीला कुस्ती शिकवणाऱ्या सुशील कुमारने २०२१ च्या ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते.

Tokyo 2020 : ऐतिहासिक क्षण, पण सुवर्णपदकाची हुलकावणी; रवी दहियाला रौप्यपदक!

टोक्यो ऑलिम्पिकसाठी केले होती टीव्हीची मागणी

तिहार कारागृहात सुशील कुमारला टीव्हीची सुविधा देण्यात आली आहे. तो इतर कैद्यांसोबत टोक्यो ऑलिम्पिक पाहू शकतो. गुरुवारी जेव्हा रवी दहिया सुवर्णपदकासाठी लढत होता, तेव्हा सुशील फाइनल पाहण्यासाठी दुपारपासून टीव्हीसमोर बसला होता. सुशील कुमारनं वकिलाकरवी टीव्हीची मागणी केली होती. सुशील कुमारने तिहार जेलमधल्या त्याच्या बरॅकमध्ये टीव्ही हवा असल्याचं तुरुंग अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. २ जुलैला त्याने ही मागणी केली होती. कुस्तीविश्वात घडणाऱ्या घडामोडी माहिती होण्यासाठी टीव्ही हवा असल्याचं सुशील कुमारनं आपल्या अर्जात म्हटलं होतं. त्यानंतर तुरुंग प्रशासनाने ही मागणी मान्य केली होती.

दोन महिन्यांपूर्वी घडला होता गुन्हा

४ मे रोजी दिल्लीतल्या छत्रसाल स्टेडियमबाहेर सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांचं सागर धनकरसोबत भांडण झालं होतं. हा वाद विकोपाला जाऊन या सगळ्यांनी मिळून सागर धनकरला मारहाण केली. ही मारहाण इतकी जास्त होती की त्यामध्ये उपचारांदरम्यान सागर धनकरचा मृत्यू झाला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सुशील कुमार फरार झाला होता. त्याला पोलिसांनी शिताफीने दिल्लीमधून अटक केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tokyo olympic 2020 sushil kumar watched ravi dahiya match from tihar jail got emotional srk

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या