टोक्यो ऑलिम्पिक भारतासाठी संस्मरणीय ठरले. जपानच्या राजधानीत झालेल्या या खेळांच्या महाकुंभमध्ये भारताने विक्रमी कामगिरी केली. भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदके जिंकली. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताची पदकसंख्या सातवर पोहोचली. यापूर्वी, भारताची सर्वोत्तम कामगिरी सहा पदके होती, जी त्यांनी २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये केली होती. मात्र, त्यावेळी भारताला सुवर्ण जिंकता आले नव्हते. टोक्योपूर्वी, २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले होते, जे नेमबाज अभिनव बिंद्राने जिंकले होते. या सात पदकांमुळे देशात उसळली आनंदाची लाट मीराबाई चानू वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक जिंकून दिले. तिने महिलांच्या ४९ किलो गटात रौप्यपदक जिंकले. २००० च्या सिडनी ऑलिम्पिकनंतर वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे दुसरे पदक आहे. पी.व्ही. सिंधू पी.व्ही. सिंधूने महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकणारी ती पहिली बॅडमिंटनपटू आहे. रिओमध्ये तिने रौप्यपदक मिळवले. लव्हलिना बोरगोहेन लव्हलिना बोरगोहेनने बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक जिंकले. विजेंदर सिंग (२००८) आणि मेरी कोम (२०१२) नंतर ऑलिम्पिक पदक जिंकणारी लव्हलिना ही तिसरी भारतीय बॉक्सर आहे. रवी दहिया रवी दहियाला कुस्तीतील पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताचे हे चौथे पदक ठरले. हेही वाचा - PHOTOS : यंदा ५ खेळाडूंनी गाजवलंय कसोटी क्रिकेट; यात दोघे आहेत पाकिस्तानी! भारतीय पुरुष हॉकी संघ उपांत्य फेरीत निराशाजनक पराभवानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. जर्मनीला हरवून भारताने कांस्यपदक जिंकले. भारताने तब्बल ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये हॉकीमध्ये पदक जिंकले. बजरंग पुनिया कुस्तीपटू बजरंग पुनियाने कुस्तीमध्ये ६५ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. बजरंगने कझाकिस्तानच्या दौलत नियाबेकोव्हला हरवून पदक जिंकले होते. नीरज चोप्रा टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे सातवे आणि शेवटचे पदक भालाफेकपटू नीरज चोप्राने जिंकले. त्याने ८७.५८ मीटर अंतर पार केले होते. त्याने सुवर्ण जिंकून मोठा इतिहास रचला. भारतासाठी वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा तो पहिला ट्रॅक आणि फील्ड खेळाडू आहे.