टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारतीयाचं धावपटू दुती चंद हिच्या कामगिरीकडे लक्ष होते. मात्र, दुतीच्या सामन्यावर नजर खिळवून बसलेल्या चाहत्यांच्या पदरी निराशा पडली. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या २०० मीटर शर्यती दुती चंदचे आव्हान संपुष्टात आलं. दुती चंदला सातवं स्थान मिळालं. दुतीला उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नसला, तरी तिने या स्पर्धेत नवीन विक्रमाची नोंद केली आहे. विशेष म्हणजे तिने स्वतःचाच विक्रम मोडीत काढला आहे.
टोक्यो ऑलिम्पिकच्या दहाव्या दिवशी म्हणजेच आज भारतीयांचं धावपटू दुती चंद आणि कमलप्रीत कौर यांच्या कामगिरीकडे लक्ष लागलेलं होतं. यात दुती चंदकडून चाहत्यांची निराशा झाली. ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या २०० मीटर शर्यतीत भारताच्या दुती चंदला सेमीफायनलमध्ये प्रवेश करता आला नाही. २०० मीटर शर्यतीत दुती चंद सातव्या क्रमांकावर राहिली.




स्पर्धेतून बाहेर जावं लागलं असलं तरी दुतीने या हंगामातील सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन केलं. दुतीने महिलांच्या २०० मी. धावण्याच्या शर्यतीत सातवे स्थान पटकावले. हे अंतर पूर्ण करण्यासाठी तिला २३.८५ सेकंदांचा वेळ लागला. दुतीने या मोसमातील स्वतःचाच विक्रम मोडला आहे. कारण या मोसमात भारतीय धावपटूने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याचबरोबर दुतीने केलेली ही तिची या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी आहे.
#TeamIndia | #Tokyo2020 | #Athletics
Women’s 200m Round 1 Heat 4 Results@DuteeChand clocks Season Best timing of 23.85 to finish 7th in Heat 4 race. Placed 38th overall to bow out of the contention for Semifinals. Spirited effort #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/iHcKraWW1K— Team India (@WeAreTeamIndia) August 2, 2021
दुतीने हंगामातील सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन घडवलं, पण तिला उपांत्य फेरी गाठता आली नाही. नामीबियाच्या क्रिस्टीन मबोमाने २२ मिनिटं ११ सेंकदात शर्यतीत अव्वल क्रमांक पटकावला. तर अमेरिकेच्या गॅब्रियल थॉमस (वेळ २२.२० सेंकद) दुसऱ्या आणि नायजेरियाची अमिनातू सेयनी (वेळ २२.७२) तिसऱ्या स्थानी राहिली. तिघींनीही सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. या शर्यतीत सातवी आल्यामुळे तिची उपांत्य फेरी हुकली आहे. या शर्यतीमध्ये जर तिने सहावा क्रमांक पटकावला असता तर तिला उपांत्य फेरीत धावण्याची संधी मिळाली असती.