ना पगार ना उत्तर प्रदेश सरकारकडून बक्षीस… टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षकाची व्यथा

टोक्यो ऑलिम्पिकनंतर खेळाडूंना तसेच प्रशिक्षक कर्मचार्‍यांना रोख बक्षिसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते,

Tokyo Olympics bureaucratic red work delay full final salary prize women hockey coach sjoerd marijne sai
भारतीय महिला हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक शोर्ड मरिन

जपानमध्ये २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान झालेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय महिला हॉकी संघाला सुवर्ण पदक मिळवता आले नसले तरी चौथ्या क्रमांकावर राहून त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये शेवटच्या स्थानावर असलेल्या भारतीय महिला हॉकी संघासाठी हा एक उल्लेखनीय बदल होता.

या बदलाचे श्रेय नक्कीच भारतीय महिला हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक डेन्मार्कच्या शोर्ड मरिन यांना जाते. मात्र भारतीय संघाला वेगळ्या उंचीवर पोहोचलवल्या नंतरही मरिन अद्याप पगार आणि रोख पुरस्कारांच्या अंतिम हप्त्याची वाट पाहत आहे. विशेषत: त्यांच्या कारण म्हणजे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) दिलेला लॅपटॉप आणि लाल फितीतील नोकरशाही आहे.

टोक्यो ऑलिम्पिकनंतर खेळाडूंना तसेच प्रशिक्षक कर्मचार्‍यांना रोख बक्षिसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, पण ऑलिम्पिकनंतर मरिन यांचा कार्यकाळ संपला आणि काही दिवसांनी ते मायदेशी परतले.

त्यांनर द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मरिन यांनी खुलासा केला की, त्यांना भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून (SAI) शेवटचा पगार आणि उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केलेले २५ लाख रुपयांचे बक्षीस अद्याप मिळालेले नाही. “मला अद्याप उत्तर प्रदेश सरकारकडून पुरस्काराची रक्कम आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडे प्रलंबित रक्कम मिळालेली नाही. मात्र, मी त्यांच्या सतत संपर्कात आहे. मला खात्री आहे की ते हा प्रश्न लवकरच सोडवतील असे शोर्ड मरिन म्हणाले.

मरिन यांनी सविस्तर माहिती दिली नसली तरी, त्यांचा ‘पूर्ण आणि अंतिम’ पगार का रोखण्यात आला आहे, याबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे. याचे एक कारण म्हणजे त्यांनी अद्याप त्यांचा अधिकृत लॅपटॉप परत केलेला नाही. साईने मरिन यांना दिलेला लॅपटॉप ऑलिम्पिकच्या मध्यावर तुटला होता.

या प्रकरणी साईशी संपर्क साधला असता, ‘त्यांचा सहा दिवसांचा पगार रोखण्यात आला आहे, जो सुमारे एक लाख ३४ हजार रुपये आहे. अधिकृत लॅपटॉप परत केल्यानंतर ही रक्कम मरिनला दिली जाईल असे त्यांनी म्हटले.

सईने एका निवेदनात म्हटले आहे की, “पगार आधीच प्रक्रियेत आहे. महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून शोर्ड मरिन यांना दिलेली अधिकृत मालमत्ता एसएआयकडे सोपवल्यानंतर त्यांना दिली जाईल. ‘फुल अँड फायनल’साठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय प्रक्रियेचा हा भाग आहे.” साईने असेही सांगितले की, “करारानुसार, आम्ही विश्वचषकासह मोठ्या स्पर्धांमध्ये प्रशिक्षकांच्या योगदानाबद्दल मान्यता देऊ. पण परफॉर्मन्स बोनस हा कराराचा भाग नव्हता.”

भारतीय महिला हॉकी संघाने विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक पटकावले होते. त्याचवेळी त्यांनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावले. १९ ऑगस्ट रोजी लखनऊ येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात उपस्थित खेळाडू आणि काही सपोर्ट स्टाफ सदस्यांना तत्काळ पारितोषिके देण्यात आली. डच क्लब टिलबर्गबरोबर त्याच्या पुढील असाइनमेंटवर गेल्यामुळे मरिन कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tokyo olympics bureaucratic red work delay full final salary prize women hockey coach sjoerd marijne sai abn