टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरूष हॉकी संघांनी कांस्य पदक पटकावत इतिहास रचला आहे. जवळपास ४१ वर्षानंतर भारतीय हॉकी संघांनं पदकावर नाव कोरलं आहे. जर्मनीला ५-४ ने पराभूत करत कांस्य पदक पटकावलं. या विजयात माजी कर्णधार आणि गोलरक्षक पीआर श्रीजेश याचं योगदान महत्त्वाचं होतं. ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. त्यानंतर श्रीजेशचा गोलपोस्टवर बसल्याचा एका फोटो वेगाने व्हायरल होत आहे. या विजयानंतर गोलरक्षक श्रीजेशनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“माझ्यासाठी गोलपोस्ट सर्वकाही आहे. मी माझी पूर्ण कारकिर्द गोलपोस्टमध्ये घालवली आहे. मी या गोलपोस्टचा मालक आहे, असं मला दाखवायचं होतं. मी माझा आनंद साजरा केला. निराश, दु: ख विसरून मी माझी पोस्ट शेअर केली. गोलपोस्ट देखील त्या सन्मासास पात्र आहे”, असं श्रीजेशने सांगितलं.

कांस्य पदकाच्या लढतीत भारताने ४ चार गोल खाल्ले असले तरी निर्णयाक क्षणी भारताने श्रीजेशने योग्य बचाव करत भारताची एका गोलची आघाडी टीकवून ठेवत सामना जिंकला. तिसरा क्वार्टर संपला तेव्हा भारताने ५-३ ची आघाडी कायम ठेवली होती. मात्र चौथ्या क्वार्टरमध्ये लुकॅस विंडफेडरने जर्मनीला लाइफलाइन दिली. पेनाल्टी कॉर्नरमधून त्याने गोल करत जर्मनीचं आव्हान सामन्यात कायम ठेवलं. जर्मनीने भारतीय गोलपोस्टवर डागलेला गोल पीआर श्रीजेश पायाच्या मधून गेला. हा गोल श्रीजेशला रोखता आला नाही. या गोलमुळे जर्मनी आणि भारतामधील गोलचा फरक अवघ्या एकवर आला. पंचांनी शिट्टी वाजवताच जर्मनीने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय गोलपोस्टजवळ भिंत बनून उभ्या असणाऱ्या गोलपकीपरने म्हणजेच श्रीजेशने हा प्रयत्न हाणून पाडला आणि भारतीय खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला. हा गोल झाला असता तर सामना अतिरिक्त वेळेत गेला असता आणि तिथेही गोल झाला नसता तर पेनल्टी शूट आऊटने विजेता निश्चित करण्यात आला असता. मात्र भारतीय संघाने आपला संयम कायम राखत सामना ५-४ च्या फरकाने जिंकला.

Tokyo 2020 : भारत लंडन ऑलिम्पिकनंतरचा पदकांचा विक्रम मोडणार?; आतापर्यंत किती आणि कुणी मिळवली पदकं?

श्रीजेशने अत्यंत महत्वाच्या क्षणी कोणतीही चूक न करता जर्मनीला इक्वलायझर ठरु शकणारा गोल रोखल्याने भारताचे कांस्यपदक निश्चित झाले. या विजयानंतर भारतीय संघातील जवळजवळ सर्वच खेळाडूंनी श्रीजेशला कडकडून मिठी मारली.