मेडल जिंका आणि आयुष्यभर विनामूल्य तिकिटे मिळवा; ऑलिम्पिक खेळाडूंसाठी Inox ची घोषणा

देशातील सर्वात मोठी मल्टिप्लेक्स कंपन्यांपैकी एक असलेल्या आयनॉक्सने एक मोठे पाऊल उचलले आहे.

Tokyo Olympics 2020 Inox offers free movie tickets for lifetime to all Indian medalists
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे खेळाडू आयुष्यभर फ्री चित्रपट पाहू शकतील.

भारतीय खेळाडू टोक्यो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. त्याच वेळी, देशातील प्रत्येकजण खेळाडूंनी पदक जिंकावं म्हणून प्रार्थना करीत आहे आणि त्यांना प्रोत्साहन देत आहेत. अलीकडेच मीराबाई चानू यांनी वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकले आणि त्यानंतर पिझ्झा कंपनी डोमिनोसने आयुष्यभर विनामूल्य पिझ्झा देण्याची घोषणा केली. आता याच भागात, देशातील सर्वात मोठी मल्टिप्लेक्स कंपन्यांपैकी एक असलेल्या आयनॉक्सनेही एक मोठे पाऊल उचलले आहे.

मंगळवारी आयनॉक्सने घोषित केले की, टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे खेळाडू आयुष्यभर फ्री चित्रपट पाहू शकतील. त्याचबरोबर, संघातील सर्व सदस्यांना १ वर्षासाठी चित्रपटाचे तिकीट मोफत दिले जाईल. म्हणजेच, टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणार्‍या कोणत्याही खेळाडूला आयुष्यासाठी आयनॉक्सकडून विनामूल्य चित्रपटाचे तिकीट मिळेल. याव्यतिरिक्त, टोक्योला गेलेल्या क्रीडापटूच्या संपूर्ण संघाला आयनॉक्सकडून एक वर्षासाठी विनामूल्य चित्रपटाची तिकिटे दिली जातील.

आयुष्यभर मोफत पिझ्झा

टोक्यो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताची पदककमाई मिराबाई चानू यांच्यामुळे झाली. वेटलिफ्टिंगमध्ये चानू यांनी रौप्यपदक जिंकत ‘रौप्यक्रांती’ घडवली. चानूने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करीत देशाचे पदकांचे खाते उघडले. जागतिक अजिंक्यपद स्पध्रेतील सुवर्णपदक, दोन राष्ट्रकुल पदके (२०१४-रौप्य, २०१८-सुवर्ण) आणि आशियाई अजिंक्यपद स्पध्रेतील कांस्यपदकानंतर अखेर चानूचे ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न साकारले. तिच्या या कामगीरीने शनिवारी समस्त भारतीयांना सुखद भेट दिली. तिच्या विजयाची बातमी येताच सर्वत्र आनंद व्यक्त झाला, आजही होत आहे. प्रत्येकजण या आनंदाच्या बातमीमध्ये आपल्यापरीने आनंद व्यक्त करत आहे. पिझ्झा जायंट डॉमिनोज इंडिया यांनी याचाच एक भाग म्हणून मिराबाई चानू यांना आयुष्यभर विनामूल्य पिझ्झा देणार असल्याची घोषणा केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tokyo olympics inox offers free movie tickets for lifetime to all indian medalists srk

ताज्या बातम्या