tokyo olympics wrestling : बजरंग पुनियाची विजयी सुरूवात; उपांत्यपूर्व फेरीत धडक

पुरूषांच्या ६३ किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत भारताच्या बजरंग पुनियाने विजय मिळवला

पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटातील स्पर्धेत बजरंग पुनियाने विजय मिळवला. (PTI/File Photo)

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेच्या १५ व्या दिवशी भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने धडाकेबाज सुरूवात केली. पुरूषांच्या ६५ किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत भारताच्या बजरंग पुनियाने विजय मिळवला. बजरंगने किर्गिस्तानचा कुस्तीपटू अरनाजर अकमातालिवचा मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयाबरोबरच बजरंगने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहियाने रौप्यपदक पटकावल्यानंतर भारताच्या नजरा आता बजरंग पुनियावर खिळल्या आहेत. बजरंग पुनियाने पुरूषांच्या ६५ किलो वजनी गटात दमदार सुरूवात करत पदकाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. बजरंग पुनियाचा किर्गीस्तानचा कुस्तीपटू अरनाजर अकमातालिवसोबत लढत झाली.

सामन्याच्या सुरूवातीलाच बजरंग पुनियाने आक्रमक खेळ करत ३-१ अशी आघाडी घेतली होती. पहिल्या सत्रात आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या सत्रात बजरंग पुनियाने अकमातालिवला चितपट करण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या पायावर पकड मिळवता आल्यानं पुनियाचा डाव चुकला. अखेरचे ३० सेंकद शिल्लक असेपर्यंत बजरंग पुनिया आघाडीवर होता. मात्र, अकमातालिवने दोन अंक मिळवत बरोबरी साधली.

दोघांनीही ३-३ अशी बरोबर साधल्यानंतर बजरंग पुनियाने मोठा डाव खेळण्याचा प्रयत्न केल्याचा आधारावर विजयी घोषित करण्यात आलं. या विजयाबरोबरच बजरंग पुनिया उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला असून, उपांत्यपूर्व फेरीत बजरंगचा सामना ईराणच्या मोर्तेझा चेक घैआसीसोबत होणार आहे. पुरुष फ्री स्टाइल ६५ किलो वजनी गटात कुस्तीगीर बजरंग पुनियाच्या कामगिरीकडे देशाचं लक्ष असून, २०१६च्या रिओ ऑलिम्पिकला मुकल्यानंतर बजरंगने सगळ्याच आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धात आपला ठसा उमटवला असून, २०१८ आणि २०१९च्या विश्वचषक स्पर्धामध्येही त्याने एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकलेलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tokyo olympics wrestling wrestler bajrang punia wrestler bajrang punia latest update bmh

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या