Tokyo Paralympics: कृष्णा नागरने जिंकलं सुवर्णपदक; १९ पदकं जिंकत भारताची ‘गोल्डन’ कामगिरी

भारताच्या पदकसंख्येने १९ हा विक्रमी आकडा गाठला आहे

Tokyo Paralympics, Badminton Mens Singles, Krishna Nagar, Kai Man Chu, Gold sgy
कृष्णा नागरने हाँगकाँगच्या शू मान कायशीचा परभव करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.
टोक्यो पॅरालिम्पिकच्या समारोपाच्या दिवशी भारतीय खेळाडूंनी आपला विजयरथ कायम ठेवला आहे. पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यथिराजने रौप्यपदक जिंकल्यानंतर आता आणखी एक पदक भारताच्या नावावर झालं आहे. कृष्णा नागरने सुवर्णपदक जिंकलं असून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यासोबत भारताच्या पदकसंख्येने १९ हा विक्रमी आकडा गाठला आहे. कृष्णा नागरच्या विजयासोबतच भारताच्या खात्यात ५ सुवर्णपदकं, ८ रौप्य आणि ६ कांस्य पदकांचा समावेश झाला आहे.

प्रमोदचे ऐतिहासिक सुवर्ण यश
टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये सुहास यथिराजने रचला इतिहास; रौप्यपदक मिळवणारे पहिले IAS अधिकारी

कृष्णा नागरने हाँगकाँगच्या शू मान कायशीचा परभव करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. याआधी विश्वविजेत्या प्रमोद भगतने शनिवारी पॅरालिम्पिकमधील पुरुष एकेरी बॅडमिंटन एसएल३ क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली. तर मनोज सरकारने कांस्यपदक जिंकत हा आनंद द्विगुणित केला होता. यंदा पॅरालिम्पिकमध्ये प्रथमच बॅडमिंटनचा समावेश करण्यात आला आहे.

उपांत्य लढत गमावल्यामुळे कांस्यपदकाची लढत खेळणाऱ्या तरुण ढिल्लाँ याच्याकडून एका पदकाची अपेक्षा होती. मात्र पराभव झाल्याने ही संधी हुकली.

IAS अधिकारी सुहास यथिराज यांना रौप्यपदक

याआधी सुहास यशिराजने समारोपाच्या दिवशी रौप्यपदक जिंकलं. सुहासला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती. मात्र पराभव झाल्यामुळे रौप्यपदकावरच समाधान मानावं लागलं.

सुहास यथिराज आयएएस अधिकारी असून टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला आहे. सुहास यथिराज पदक जिंकणारा पहिला आयएएस अधिकारी ठरला आहे. अंतिम सामन्यात सुहास यशिराजसमोर फ्रान्सच्या अग्रमानांकित ल्युकास मझूरचं आव्हान होतं. याआधी सुहासने उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या फ्रेडी सेटियावानवर २१-९, २१-१५ अशा ३१ मिनिटांमध्ये विजय मिळवला होता.

अंतिम सामन्यात फ्रेडी सेटियावानने सुहास यथिराजचा पराभत करत सुवर्णपदक जिंकलं. तर सुहास यथिराजे रौप्यपदकाची कमाई केली आहे. कर्नाटकमध्ये जन्म झालेला सुहास यथिराज उत्तर प्रदेशातील नोएडा येथे जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tokyo paralympics badminton mens singles sh6 krishna nagar wins gold medal sgy