scorecardresearch

Premium

अष्टपैलू घडण्यात अतिक्रिकेटचा अडथळा – जॅक कॅलिस

ट्वेन्टी-२० क्रिकेटचे आगमन, त्याचा वाढता प्रभाव, नियमात झालेले बदल यामुळे बहुविध कौशल्य असलेले क्रिकेटपटू घडण्याची प्रक्रियाच थंडावली.

too much cricket is affecting development of all rounders says jacques kallis
दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस

नवी दिल्ली : अलीकडच्या काळात सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये अति खेळ होत असल्यामुळेच अष्टपैलू क्रिकेटपटू घडण्याचे मार्ग बंद होत आहेत, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसने व्यक्त केले. याचा सर्वाधिक फटका कसोटी क्रिकेटमध्ये बसत आहे.

सर गारफिल्ड सोबर्स (८०३२ धावा आणि २३५ बळी) यांना क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू मानले जाते. त्यानंतर आधुनिक क्रिकेटमध्ये तीनही प्रारूपांत खेळताना कॅलिसने एकत्रित २० हजार धावा आणि ६०० गडी बाद केले आहेत. सोबर्स यांच्या नंतर १९८०च्या दशकात इमरान खान, रिचर्ड हॅडली, इयन बॉथम, कपिलदेव हे सर्वोत्तम अष्टपैलू होते. या खेळाडूंचा काळ संपल्यावर अँड्रयू फ्लिंटॉफ आणि जॅक कॅलिस यांची नावे घेतली जातात.

Manoj Tiwary vs MS DHoni
“माझ्याकडे गमावण्यासाठी काही नाही, त्यामुळे मी धोनीला विचारेन…”, निवृत्तीनंतर मनोज तिवारीने व्यक्त केली खंत
it was my dream to play for india in front of my father says sarfaraz khan
वडिलांसमोर भारतासाठी खेळण्याचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद! भारताचा फलंदाज सर्फराज खानची प्रतिक्रिया
India badminton player p v Sindhu believes that Olympics are more challenging than before sport news
यंदाचे ऑलिम्पिक पूर्वीपेक्षा आव्हानात्मक! अनुभवाची शिदोरी महत्त्वपूर्ण; भारताची बॅडमिंटनपटू सिंधूचे मत
Rahul Dravid believes that Ishan needs to start playing for selection
निवडीसाठी इशानला खेळण्यास सुरुवात करण्याची गरज- द्रविड

हेही वाचा >>> भारतीय महिला संघाकडून निराशा; इंग्लंडकडून पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात ३८ धावांनी पराभूत; शफालीची एकाकी झुंज

मात्र, ट्वेन्टी-२० क्रिकेटचे आगमन, त्याचा वाढता प्रभाव, नियमात झालेले बदल यामुळे बहुविध कौशल्य असलेले क्रिकेटपटू घडण्याची प्रक्रियाच थंडावली. या सगळय़ावर कॅलिसने आपल्या फलंदाजीप्रमाणे सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. कॅलिस म्हणाला,‘‘या प्रश्नाचे उत्तर देणे किंवा शोधणे खूप कठीण आहे. अष्टपैलू खेळाडू काही एका दिवसात घडत नसतो. इतिहासाकडे वळून बघितले की हे लक्षात येईल. हे सगळे किती क्रिकेट खेळले जाते यावर अवलंबून आहे.’’

कॅलिसने या वेळी ‘आयपीएल’चा उल्लेख न करता या लीगमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रभावी खेळाडू (इम्पॅक्ट प्लेअर) या नियमावर नाराजी व्यक्त केली. ‘‘या नियमामुळे संघ अष्टपैलू खेळाडूला आपोआप दूर करत आहेत. अंतिम अकरा खेळाडूमधून एकाला सामना सुरू असताना बदलणे आणि त्या बदललेल्या खेळाडूला खेळण्याची संधी देणे हा नियम आपल्याला काही पटत नाही,’’ असे कॅलिसने सांगितले.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवडण्यात आलेला संघ खूप चांगला आहे. पण, दक्षिण आफ्रिकेला मायदेशात हरवणे खूप कठीण आहे. मालिकेतील सेंच्युरियन हे केंद्र यजमान संघासाठी पूरक आहे, तर न्यूलँड्समध्ये भारताला पोषक वातावरण असेल. त्यामुळे नेहमीप्रमाणे ही मालिका चुरशीची होईल.  – जॅक कॅलिस

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Too much cricket is affecting development of all rounders says jacques kallis zws

First published on: 07-12-2023 at 02:36 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×