scorecardresearch

फेडरर विरुद्ध नदाल १० रोमांचक लढती..

संपूर्ण टेनिस विश्वाचे लक्ष आजच्या सामन्याकडे असणार आहे

फेडरर विरुद्ध नदाल १० रोमांचक लढती..
ऑस्ट्रेलियन ओपनचा आज खेळवला जाणारा अंतिम सामना ऐतिहासिक ठरू शकतो.

ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत यंदा रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांचे द्वंद्व पाहायला मिळणार आहे. टेनिस विश्वातील हे दोन शिलेदार २०११ नंतर रविवारी पहिल्यांदाच ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत लढतात दिसतील. दोघांच्याही निवृत्तीच्या चर्चा असल्याने यापुढे हे दोघं एकमेकांविरोधात असे अंतिम फेरीत खेळताना पाहण्याची संधी मिळण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपनचा आज खेळवला जाणारा अंतिम सामना ऐतिहासिक ठरू शकतो. संपूर्ण टेनिस विश्वाचे लक्ष आजच्या सामन्याकडे असणार आहे. दोघंही आतापर्यंत ३५ वेळा एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. फेडरर विरुद्ध नदाल सामना म्हटलं टेनिस चाहत्यांसाठी एका रोमांचक लढतीचा अनुभव घेण्याची संधी असते. टेनिस विश्वातील सर्वोत्तम लढतीच्या उदाहरण्यांच्या यादीत या दोघांमध्ये झालेले अनेक सामने सांगता येतील. त्यातील १० निवडक रोमांचक लढतींवर एक प्रकाशझोत..

१०) मिआमी ओपन २००४

मिआमी ओपन २००४ साली राफेल नदालचा फेडरर विरुद्ध पहिला सामना झाला होता. खरंतर रॉजर फेडरर त्यावेळी वर्ल्ड नंबर वन खेळाडू होता, तर राफेल नदालने नुकतेच आपल्या करिअरला सुरूवात केलेला १७ वर्षांचा युवा खेळाडू होता. राफेलने फेडररवर मात करून सर्वांना चकीत केले होते.

९) फ्रेंच ओपन २००५ : नदालची फेडररवर उपांत्यफेरीत मात

राफेल नदालने आपल्या अप्रतिम खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेण्यास सुरूवात केली होती, तर वर्ल्ड नंबर वन फेडरर याआधीच टेनिस चाहत्यांच्या मनावर राज्य करत होता. त्यामुळे नदाल विरुद्ध फेडरर आमने-सामने येण्याची संपूर्ण टेनिस विश्व वाट पाहत असे. फ्रेंच ओपन २००५ मध्ये तसा योग जुळून आला. दोघंही स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आमने-सामने आले. यावेळी नदालने फेडररवर ६-३, ४-६, ६-४, ६-३ अशा सेटमध्ये मात केली.

८) बेसेलमध्ये फेडररची नदालवर मात-

२०१५ साली रॉजर फेडररने जबरदस्त कामगिरी करत राफेल नदालवर ६-३, ५-७, ६-३ अशी मात केली होती. २१ महिन्यांनंतर दोघं एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यामुळे या सामन्याची सर्वांमध्ये कमालीची उत्सुकता होता. शिवाय, गेल्या सहा प्रयत्नांमध्ये फेडररला नदालवर मात करण्यात अपयश आले होते. अशावेळी फेडररने अफलातून कामगिरीचा नजराणा पेश करत नदालचा पराभव केला होता.

७) २००६ सालच्या मास्टर्स कपमध्ये फेडररची नदालवर मात-

मास्टर्स कप स्पर्धेतील ही लढत देखील आजवरच्या महत्त्वपूर्ण लढतींपैकी एक समजली जाते. नदालकडून दमदार कामगिरीची अपेक्षा जवळपास सर्वच माध्यमांनी व्यक्त केली होती. पण यावेळी फेडररने नदालचा ६-४, ७-५ असा लाजीरवाणा पराभव केला होता.

६) ऑस्ट्रेलियन ओपन २०१२ उपांत्य फेरी, नदालची फेडररवर मात-

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये २०१२ साली हे दोघं उपांत्य फेरीतच एकमेकांसमोर उभे ठाकले होते. यावेळी नदालने फेडररवर ६-७(५), ६-२, ७-६ (५),६-४ अशा चुरशीच्या लढाईत मात दिली होती.

५) मिआमी ओपन २००५ फेडररची पुन्हा एकदा नदालवर मात-

मिओमी ओपन २००५ मध्ये फेडररने नदालवर २-६, ६-७(४), ७-६(५), ६-३, ६-१ असा रंगतदार झाला होता. पहिल्या सेटमध्ये २-६ अशा मोठ्या फरकाने गमावल्यानंतर फेडररने पुनरागमन करत पुढील सर्व सेटमध्ये अफलातून कामगिरी केली आणि सामना जिंकला.

४) ऑस्ट्रेलियन ओपन २००९ अंतिम फेरी-

रॉजर फेडररला यावेळी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. फेडररला नदाल विरुद्ध पाचही सेटमध्ये पराभव स्विकारावा लागला होता.

३) विम्बल्डन २००५ अंतिम फेरीतील लढत-

विम्बल्डनची २००५ सालची अंतिम फेरीतील लढत ऐतिहासिक ठरली होती. राफेल नदाल आणि फेडरर कट्टर प्रतिस्पर्धी झाले होते. या लढतीआधी राफेललने पॅरीसमध्ये लाल मातीत आपले वर्चस्व सिद्ध केले होते, तर फेडररने लंडन ओपन जिंकून गवतावरचे बादशहा असल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे विम्बल्डनमध्ये आपली ‘दादागिरी’ दाखवून देण्यासाठी दोघंही सज्ज होते. यावेळी फेडररने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत नदालवर मात केली होती.

२) नदाल विरुद्ध फेडरर, रोम २००६

रोममध्ये २००६ साली झालेल्या नदाल विरुद्ध फेडरर लढतीचे उदाहरण टेनिस विश्वातील सर्वोत्तम लढतीसाठी दिले जाते.

१) विम्बल्डन २००८ मध्ये नदालकडून पराभवाचा वचपा-

राफेल नदाल याने २००५ सालच्या विम्बल्डन स्पर्धेतील पराभवाचा वचपा यावेळी काढला. नदालने २००८ सालच्या विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम लढतीत फेडररवर ६-४, ६-४, ६-७(५), ६-७(८), ९-७ अशी मात दिली होती.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या