Indians Players Flop Show In IPL 2026: आयपीएल २०२६ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. आता साखळी फेरीतील काही सामने शिल्लक असून येत्या काही दिवसात प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. आतापर्यंत अनेक असे युवा खेळाडू आहेत ज्यांनी दमदार कामगिरी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण काही असे खेळाडू देखील आहेत ज्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, पण ते नावाला साजेशी कामगिरी करू शकलेले नाहीत. आता या खेळाडूंना भारतीय संघात पुन्हा स्थान मिळणं कठीण आहे. दरम्यान कोण आहे ते खेळाडू? जाणून घ्या.
सूर्यकुमार यादव:
भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव या यादीत अव्वल स्थानी आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जेतेपदाचा मान पटकावला. पण तो फलंदाजीत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. या हंगामात तो मुंबईकडून एकही मोठी खेळी करू शकलेला नाही. त्याने ११ सामन्यांमध्ये अवघ्या १९५ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याचं कर्णधारपद जाऊ शकतं आणि संघात स्थान मिळणंही कठीण आहे.
अक्षर पटेल:
अक्षर पटेल देखील भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधार आहे. तर आयपीएल स्पर्धेत तो दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्व करत आहे. एक दोन सामने सोडले तर तो संघासाठी फारशी चांगली कामगिरी करू शकलेला नाही. गेल्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावलं. पण गोलंदाजीत विकेट्स घेण्यात तो अपयशी ठरत आहे.
हार्दिक पंड्या:
भारतीय संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेला हार्दिक पंड्या कर्णधार म्हणून, फलंदाज म्हणून आणि गोलंदाज म्हणूनही फ्लॉप ठरला आहे. तो गोलंदाजीत विकेट्स घेण्यात अपयशी ठरला आहे. यासह फलंदाजी करताना एकही मोठी खेळी करून संघाला विजय मिळवून देवू शकलेला नाही.
शिवम दुबे:
भारतीय संघाला २ वेळा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा शिवम दुबे आयपीएल २०२६ स्पर्धेत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याला गोलंदाजी करण्याची हवी तितकी संधी मिळालेली नाही. तर फलंदाजीत तो धावा करू शकलेला नाही.
जसप्रीत बुमराह:
जसप्रीत बुमराह हा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. पण आयपीएल २०२६ स्पर्धेत एक – एक विकेट घेण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे.
