WTC 2023 Final India vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने आहेत. लंडनमधील ओव्हल येथे हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना ट्रॅव्हिस हेडने शानदार शतक झळकावले. त्याने स्टीव्ह स्मिथसह आपल्या संघाचा डाव सावरला. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने शतक झळकावले. त्याने १०६ चेंडूत कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. हेडचे शतक हे जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या इतिहासातील पहिले शतक आहे. २०२१ मध्ये झालेल्या अंतिम फेरीत एकाही फलंदाजाला तीनचा आकडा गाठता आला नाही. मात्र, या अंतिम फेरीत हेडने इतिहास घडवला. ऑस्ट्रेलियाने तीन गडी गमावून २३८ धावा केल्या आहेत. सध्या स्टीव्ह स्मिथ ५३ आणि ट्रॅव्हिस हेड १०० धावांवर खेळत आहेत. ट्रॅव्हिस हेडने १०६ चेंडूंचा सामना करताना १४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद १०० धावा केल्या. त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथसह चौथ्या विकेट्ससाठी नाबाद १६२ धावांची दणदणीत भागीदारी केली.

Cameron Green ruled out of Test series against India in Border-Gavaskar Trophy 2024-25
IND vs AUS : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडू झाला बाहेर
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Virat Kohli airport video viral ahead IND vs NZ Series and BGT
Virat Kohli : ‘BGT मध्ये आग लावायची आहे…’, चाहत्याच्या विधानानंतर विराट कोहलीची प्रतिक्रिया व्हायरल, पाहा VIDEO
Rohit Sharma Likely To Miss IND vs AUS One Test in Australia Border Gavaskar Trophy
Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काही कसोटींना मुकणार? काय आहे कारण
Marnus Labuschagne Stuns Umpire With Unorthodox Field During Sheffield Shield Match Video Goes Viral
VIDEO: मार्नस लबूशेनने उभा केला पंचांच्या मागे क्षेत्ररक्षक; व्हीडिओ पाहून तुम्ही चक्रावून जाल
NZ W vs AUS W Match Highlights Australia beat New Zealand
NZ W vs AUS W : ऑस्ट्रेलियाचा सलग दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय, भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग झाला खडतर
India Women vs New Zealand Women match highlights in marathi
IND W vs NZ W : टीम इंडियाचा सलामीच्या सामन्यात दारुण पराभव, न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढे भारताची उडाली भंबेरी
Vaibhav Suryavanshi scores fastest hundred for India in U19
Vaibhav Suryavanshi : १३ वर्षीय फलंदाजाने केला मोठा पराक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले वादळी शतक

सामन्याबद्दल बोलायचे, तर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ६५ षटकांनंतर ३ बाद २३८ धावा केल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर ट्रॅव्हिस हेड (१००) आणि स्टीव्ह स्मिथ (५३) धावांवर खेळत आहे. तत्पुर्वी उस्मान ख्वाजा (०) आणि डेव्हिड वार्नर ४३ धावांवर बाद झाला. ते मार्नस लाबूशेन २६ धावांचे योगदान देऊन बाद झाला. भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकुरने प्रत्येकी १-१ विकेट घेतली. बाद झालेल्या तिन्ही फलंदाजांचे झेल यष्टिरक्षक श्रीकर भरतने टिपले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

हेही वाचा – IND vs AUS WTC Final 2023: श्रीकर भरतचा सुपरमॅन अवतार! हवेत झेप घेत डेव्हिड वार्नरचा टिपला अप्रतिम झेल, पाहा VIDEO

ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.