scorecardresearch

Turkey Earthquake: ‘काळ आला होता पण…’ स्टार फुटबॉलपटूला ढिगाऱ्यातून सुखरुप बाहेर काढण्यात यश

तुर्कस्तानमधील भूकंपाने संपूर्ण जग हादरले आहे. या नैसर्गिक आपत्तीत काही खेळाडू इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. त्यातील घानाच्या फुटबॉलपटूला वाचवण्यात यश आले.

Turkey Earthquake: Time has come but Star footballer pulled out safely from rubble
सौजन्य- (ट्विटर)

तुर्कस्तानमध्ये सोमवारी झालेल्या भूकंपाने संपूर्ण जग हादरले. भूकंपामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. हजारो लोकांना जीव गमवावा लागला. या घटनेत चेल्सी आणि न्यूकॅसलचा माजी फुटबॉलपटू ख्रिस्तियन अत्सू बेपत्ता होता. भूकंपामुळे पडलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली तो कुठेतरी गाडला गेला असावा, असा संशय लोकांमध्ये होता. अत्सू हा घानाचा खेळाडू जो तुर्कस्तानच्या हॅतेसपोर क्लबकडून खेळतो तो भूकंपानंतर बेपत्ता होता. अत्सू यांनी क्लबचे प्रवक्ते मुस्तफा ओझात यांना सांगितले की ते ज्या इमारतीत होते त्या इमारती भूकंपामुळे नष्ट झाल्या आहेत. याच इमारतीच्या ढिगाऱ्यातून क्लबकडून खेळणाऱ्या दोन खेळाडूंना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

केवळ नशीब बलवत्तर म्हणून घानाचा माजी फुटबॉलपटू ख्रिस्तियन अत्सू ढिगाऱ्याखालून सापडला. तुर्कस्तानच्या विनाशकारी भूकंपानंतर लॅसी आणि न्यूकॅसलचे माजी फॉरवर्ड ख्रिश्चन अत्सू याला ढिगाऱ्यातून वाचवण्यात यश आले आहे. घाना फुटबॉल असोसिएशनने ट्विटरवर यासंदर्भातील माहिती दिली आहे. घानाचा खेळाडू अत्सू हातायस्पोर या तुर्की क्लबकडून खेळतो.

क्लबचे प्रवक्ते मुस्तफा ओझत यांनी सांगितले की, “तो नष्ट झालेल्या इमारतीत होता. क्लबच्या दोन खेळाडूंना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. अत्सूचा ठावठिकाणा सापडत नव्हता.” परंतु घाना फुटबॉल असोसिएशनने मंगळवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, “आम्हाला सकारात्मक बातमी मिळाली आहे की ख्रिस्तियन अत्सूची सुटका करण्यात आली आहे.” ख्रिस्तियन अत्सूवर सध्या उपचार सुरू आहेत, मात्र त्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. तुर्कस्तान आणि शेजारच्या सीरियाला सोमवारी झालेल्या ७.८ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपात ५,००० हून अधिक लोक ठार झाले. तर हजारो लोक जखमी झाले आहेत.

हजारो लोकांचा मृत्यू

माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, सोमवारी तुर्की आणि शेजारच्या सीरियामध्ये ७.८ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपात ४८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक जखमी झाले आहेत. या भूकंपामुळे देशातील अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण बचावकर्ते अजूनही बाधित भागात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. अनेक जीव अजूनही ढिगाऱ्याखाली दबले आहेत. दोन्ही देशांमध्ये एकाच वेळी भूकंपाचे धक्के जाणवले.

हेही वाचा: Ravi Shastri: “सावधान! टीम इंडियाचा ‘हा’ फलंदाज तुम्हाला काट्यासारखा…”, माजी प्रशिक्षक शास्त्रींनी ऑस्ट्रेलियाला दिला जपून राहण्याचा सल्ला

दुसऱ्या दिवशीही तुर्की हादरले

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सध्या थंडीचा हंगाम आहे. भूकंपामुळे लोकांना घराबाहेर पडावे लागले आहे. लाखो लोक घराबाहेर पडले आहेत. भूकंपानंतर दोन्ही देशांच्या मदतीसाठी भारताने एनडीआरएफची टीमही तिथे पाठवली आहे. भारताच्या पंतप्रधानांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला होता. तुर्कस्तानमध्ये आज म्हणजेच मंगळवारीही दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. मंगळवारी ५.४ आणि ५.९ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 18:37 IST