scorecardresearch

Cristiano Ronaldo: पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला म्हणून रोनाल्डोला संघाबाहेर ठेवलं; टर्कीच्या अध्यक्षांचा दावा

Cristiano Ronaldo Latest Uupdate: फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीच्या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोला बेंचवर बसवण्यात आले होते. त्यामुळे पोर्तुगालच्या प्रशिक्षकावर जगभरातून टीकाही झाली होती.

Cristiano Ronaldo: पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला म्हणून रोनाल्डोला संघाबाहेर ठेवलं; टर्कीच्या अध्यक्षांचा दावा
ख्रिस्तियानो रोनाल्डो (संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

कतारमध्ये नुकत्याच झालेल्या फिफा विश्वचषकात काही सामन्यांमध्ये पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला बेंचवर बसवण्यात आले होते. निर्णायक सामन्यात पोर्तुगाल संघाची सर्वात मोठी ताकद बेंचवर ठेवण्याचा निर्णय कोणालाच समजला नाही. आता तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी स्टार फुटबॉलपटूला बाहेर बसवण्यामागचे कारण सांगितले आहे. टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी दावा केला की, रोनाल्डोला पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला म्हणून बाहेर बसायला लागले होते.

एर्दोगनचा हवाला देत अनेक माध्यमांनी लिहिले की, विश्वचषकात रोनाल्डोचा योग्य वापर केला गेला नाही. उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोकडून पराभूत झाल्याने त्यांचा संघ बाहेर पडला. त्या सामन्यात रोनाल्डोचा सब्स्टीट्यूट म्हणून वापर करण्यात आला होता. अलीकडेच, स्पॅनिशमध्ये ‘टूगेदर विथ द पॅलेस्टिनी’ असे लिहिलेले चिन्ह असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डोचा मोठ्या प्रमाणावर शेअर केलेला फोटो व्हायरल झाला. मात्र, तो मॉर्फ केलेला आढळून आला.

रोनाल्डोला केले उद्ध्वस्त –

अल जझीराच्या वृत्तानुसार, एर्दोगन यांनी एका कार्यक्रमात रोनाल्डोला उद्ध्वस्त केल्याचे म्हटले. त्याने स्टार फुटबॉलपटूवर राजकीय बंदी घातली. रोनाल्डो पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ उभे राहिलेल्या लोकांपैकी एक आहे. इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धाबाबत रोनाल्डोने कधीही कोणतेही सार्वजनिक वक्तव्य जारी केले नाही, असा दावाही अल जझिराने केला आहे. तसेच २०१९ मध्ये, गोल्डन बूट पुरस्काराचा लिलाव झाल्यानंतर रोनाल्डोने पॅलेस्टिनींना 1.5m युरो दान केल्याची व्यापक प्रसारित कथा, फुटबॉलपटूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या क्रीडा व्यवस्थापन कंपनीने नाकारली होती.

रोनाल्डोवर झाला मानसिक परिणाम –

सामन्याच्या शेवटच्या ३० मिनिटांत रोनाल्डोसारख्या मोठ्या फुटबॉलपटूला मैदानात पाठवल्याने, त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याचेही तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले. फिफा विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेडविरुद्ध एका मुलाखतीत वक्तव्य केल्याने तो वादात सापडला होता. त्यानंतर युनायटेड आणि रोनाल्डो वेगळे झाले. तो सध्या कोणत्याही क्लबचा भाग नाही.

सब्सीट्यूट खेळाडू म्हणून केला वापर –

रोनाल्डोला याआधी स्वित्झर्लंडविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात सुरुवातीच्या प्लेइंग इलेव्हन मधून वगळण्यात आले होते. यानंतर, त्याला मोरोक्कोविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत सब्सीट्यूट म्हणून मैदानात उतरवण्यात आले होते. त्या सामन्यात पोर्तुगालला ०-१ पराभवाचा सामना करावा लागला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 18:35 IST

संबंधित बातम्या