टर्मरिक लाते अशा गोंडस नावाने पदार्थ विकण्याची परंपरा अमेरिकेने दशकभरापूर्वी सुरू केली. त्यानंतर अमेरिकेत पेवच फुटलं. अमेरिकेने अनुसरलेली ही हळद परंपरा यंदाच्या वर्ल्डकपमधल्या इंग्लंड संघाने अवलंबली आहे. प्रचंड दमवणारा असा सामना खेळल्यानंतर खेळाडूंची रिकव्हरी प्रक्रिया सुरू होते. दोन सामन्यांमधला वेळ अतिशय कमी असल्याने प्रत्येक संघ रिकव्हरीसाठी वेगवेगळे प्रयोग आणि पर्याय उपयोगात आणतो आहे. इंग्लंड संघाने यलो पाव्हडर अर्थात हळदीला खेळाडूंच्या रिकव्हरी प्रक्रियेत स्थान दिलं आहे.
न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार मेक्सिकोविरुद्धच्या अझटेका या हाय अॅल्टिट्यूड ठिकाणी झालेल्या सामन्यानंतर इंग्लंडचे खेळाडू टर्मेरिक कनोकेशन्स अर्थात हळदीचं पाणी पित असल्याचं स्पष्ट झालं आहे. सतत धावल्यामुळे स्नायूंना सूज होण्याची शक्यता असते. असं होऊ नये यासाठी इंग्लंड संघव्यवस्थापनाने हळदीच्या पाण्याचा समावेश आहारात केला आहे. हळदीच्या बरोबरीने आलं आणि ओमेगा फिश ऑईल यांचाही समावेश करण्याची सूचना खेळाडूंना देण्यात आली आहे.
मेक्सिकोचं आव्हान परतावून लावल्यानंतर आता इंग्लंडसमोर नॉर्वेचं आव्हान असणार आहे. झटपट सामने आणि तेही चुरशीचे असं या स्पर्धेचं स्वरुप आहे. ९० मिनिटांचा सामना अतिरिक्त वेळेत जाताना दिसत आहे. शेवटच्या मिनिटापर्यंत विजेता कोण हे ठरत नाहीये. त्यामुळे खेळाडूंची प्रचंड ऊर्जा खर्च होते. त्यामुळे रिकव्हरीलाही भरपूर वेळ लागतो. कर्बोदकं आणि प्रथिनांचा भरणा असलेले खाद्यपदार्थ खेळाडूंच्या आहाराचा समावेश झालेलं पाहायला मिळत आहे. हॅरी केन आणि त्याचे सहकारी संघांना लागू करण्यात आलेली sop फॉलो करताना दिसत आहेत. इप्सॉम सॉल्ट आणि मॅग्नेशियम सल्फेट रिझर्व्ह यांच्यानंतर आता आईस बाथ घेणे खेळाडूंसाठी नित्याचं झालं आहे. इंग्लंडचे खेळाडू इन्फ्रारेड थेरपीसाठी लेझर प्रणालीचाही वापर करतात.
८ डिग्री अशा गारठवणाऱ्या वातावरणात आईसबाथच्या बरोबरीने एक नवी क्लृप्ती योजण्यात आली आहे. ९० डिग्री सौनाचा प्रयोग खेळाडू करत आहेत. नॉर्वेच्या हालंडने ५०,००० पौंड खर्चून क्रायोथेरपी चेंबर त्याच्या घरी बसवण्यात आलं आहे. वर्ल्डकप स्पर्धेत अन्नपदार्थांच्या बरोबरीने आईसबाथ युनिटही ये जा करतात.
रिकव्हरीसाठी लेझर रुम्सची तयार करण्यात आल्या आहेत. मँचेस्टर सिटीकडून खेळतानाही हालंड याचा प्रयोग करतो. इन्फ्रारेड रुममध्ये जास्त वेळ व्यतीत केला तर शरीराचं तापमान वाढतं आणि स्नायू मोकळे होतात. पॅनलमध्ये रेड लाईट लागतो तेव्हा वाहतं रक्त हे पायाच्या दिशेने वाहू लागतं. हे रक्त त्वचेतून स्नायू, हाडं, दिशेने जाऊ लागतं.
हालंडने १५,००० पौंड खर्चून रेडलाईट बेडमध्ये गुंतवणूक केली. द सन दिलेल्या वृत्तानुसार, व्यायाम करण्याच्या आधी पाच मिनिटं तो यामध्ये असतो आणि व्यायाम झाल्यावर २० मिनिटं व्यतीत केली तर दुखापत होण्याची शक्यता कमी होते आणि रिकव्हरी पटकन होते.
स्पेनने रिकव्हरीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला. यामध्ये EMTT (Extracorporeal Magneto Transduction Therapy) आणि NESA (Neuromuscular Electrical Stimulation) समावेश आहे.
ईएमटीटीमध्ये शरीरात वेगवान मॅग्नेटिक सिग्नल पाठवले जातात. स्पीड बॅटरी चार्जरप्रमाणे याचं काम चालतं.
स्वित्झर्लंडचे खेळाडू बेरी ज्यूसच्या माध्यमातून रिकव्हरी करतात. मेलाटोलिन अधिक मिळावं यासाठी टार्ट चेरीजही खातात. फुटबॉलमध्ये दीड तास सतत पळण्याचं काम असतं. यामुळे पायांना सातत्याने रक्तपुरवठा करत राहील असं कॉम्प्रेशन गारमेंट्स परिधान केले जातात.
नॉर्वेचा हालंड चांगली रिकव्हरी होण्यासाठी ८ ते ९ तासांच्या झोपेला प्राधान्य देतो. झोप ही जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. चांगली झोप लागावी यासाठी ब्ल्यू गॉगल घालणे आणि ज्या खोलीत झोपलो आहे तिथले सगळे सिग्नल्स बंद करणे हे मी करतो असं हालंडने लोगन पॉलच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं.
एकामागोमाग एक सामन्यांमुळे खेळाडूंना फिट होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही असं अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी सांगितलं. अर्जेंटिनाच्या संघात तिशीपल्याड वय असणारे बरेच खेळाडू आहेत. त्यामुळे सपोर्ट स्टाफ त्यांच्या रिकव्हरीवर विशेष लक्ष द्यावं लागतं.
मुंडोअमेरिका.कॉम साईटने दिलेल्या बातमीनुसार प्रत्येक खेळाडूला आठवड्याला १५० गुणांचं रिपोर्ट कार्ड सादर करावं लागतं. प्रत्येक टास्कला ठराविक गुण असतात. १४ मिनिटांच्या सायकलिंगसाठी ४० गुण, ५ फोम रोलिंगसाठी १० गुण, कोल्ड बाथ आणि मसाज यांच्यासाठी ३०, अप्पर बॉडी स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी तेवढेच गुण मिळतात. दीडशे गुण मिळवणे हे प्रत्येक खेळाडूचं उद्दिष्ट असतं. वैद्यकीय चमू प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेऊन असतं.
