वृत्तसंस्था, डरबन
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या अनुभवी खेळाडूंच्या निवृत्तीनंतर संक्रमणावस्थेतून जात असलेल्या भारताच्या ट्वेन्टी-२० संघाची आता यजमान दक्षिण आफ्रिकेशी गाठ पडणार आहे. चार सामन्यांच्या या मालिकेला आज, शुक्रवारी डरबन येथे सुरुवात होणार असून वेगवान गोलंदाजीला अनुकूल आणि अतिरिक्त उसळी असणाऱ्या खेळपट्ट्यांवर भारतीय संघातील युवा ताऱ्यांचा कस लागणार आहे.
नुकत्याच मायदेशात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला ०-३ असा दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये सध्या निराशा पसरली आहे. आता ती दूर करण्याचा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय ट्वेन्टी-२० संघाचा मानस असेल.
गेल्या महिन्यात मायदेशात झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत भारतीय संघाने बांगलादेशचे आव्हान सहज परतवून लावले होते. विशेषत: हैदराबाद येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने २० षटकांत तब्बल २९७ धावांचा डोंगर उभारून नवा विक्रम प्रस्थापित केला. आता हीच लय कायम राखत दक्षिण आफ्रिकेत चमकदार कामगिरी करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
रोहितची निवृत्ती, तसेच यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल कसोटी संघाचा भाग असल्याने ट्वेन्टी-२० सामन्यांत संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांना सलामीला पुन्हा संधी मिळणार आहे. अलीकडच्या काळात डावखुऱ्या अभिषेकला धावांसाठी झगडावे लागले आहे. त्यामुळे त्याने संधीचे सोने करणे गरजेचे आहे. गोलंदाजीत विजयकुमार वैशाक आणि आणि यश दयाल यांच्यापैकी कोणाला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. डावखुरा अर्शदीप सिंग युवा गोलंदाजी फळीचे नेतृत्व करेल.
हेही वाचा >>>IND vs SA: भारत-आफ्रिका टी-२० मालिका लाईव्ह कुठे पाहता येणार? पहिल्या-दुसऱ्या
सॅमसन सातत्य राखणार?
गेल्या महिन्यात हैदराबाद येथे झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात संजू सॅमसनने ४७ चेंडूंत १११ धावा फटकावल्या होत्या. आता कामगिरीत सातत्य राखण्याचा सॅमसनचा मानस असेल. मधल्या फळीत कर्णधार सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या आणि रिंकू सिंह यांच्यावर भारताची भिस्त असेल.

संघ
● भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंह, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाक, आवेश खान, यश दयाल.
● दक्षिण आफ्रिका : एडीन मार्कराम (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, रायन रिकल्टन (यष्टिरक्षक), हेन्रिक क्लासन (यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, ओटनील बार्टमन, जेराल्ड कोएट्झी, मार्को यान्सन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, मिहलाली एमपोंगवाना, नकाबा पीटर, अँडिले सिमेलेन.
● वेळ : रात्री ८.३० वा.
● थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा अॅप