पीटीआय, न्यूयॉर्क

भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढतीची पर्वणी आज, रविवारी तमाम क्रिकेटप्रेमींना ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत अनुभवायला मिळणार आहे. अमेरिकेत ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय झाल्यानंतर भारत-पाकिस्तान सामन्याचीच सर्वाधिक चर्चा केली जात होती. अमेरिकेत या दोनही देशांतून स्थलांतरित झालेल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ३४ हजार आसनसंख्या असलेले न्यूयॉर्कचे नसाऊ कौंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आज निळ्या आणि हिरव्या रंगाने न्हाऊन निघेल अशीच अपेक्षा आहे.

Harmanpreet Kaur's Reaction To Journalist's Question
IND vs PAK : पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नाने हरमनप्रीत कौर आश्चर्यचकित; म्हणाली, ‘हे माझं काम नाही…’, VIDEO व्हायरल
Will the Indian team go to Pakistan for the Champions Trophy
आयसीसीच्या बोर्डरूममध्ये भारत वि. पाकिस्तान! चँपियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाईल?
सलामीलाच पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत चुरस; महिला आशिया चषक स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान आमनेसामने
सलामीलाच पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत चुरस; महिला आशिया चषक स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान आमनेसामने
loksatta analysis gautam gambhir s appointment as head coach of team india even though he has no experience
रोखठोक, स्पष्टवक्ता गौतम गंभीर भारतीय क्रिकेटला नवी दिशा देणार? प्रशिक्षकपदाचा अनुभव नसतानाही नियुक्तीमागे काय कारणे?
Loksatta explained Who will win the India vs South Africa final in Twenty20 World Cup cricket tournament
भारत वि. दक्षिण आफ्रिका…दोन्ही संघ ठरवले गेले ‘चोकर्स’…अंतिम फेरीत बाजी कोणाची?
India vs England T20 World Cup 2024 Semi Final
ट्वेन्टी २० विश्वचषक क्रिकेट: उपांत्य फेरीत भारताची आज गतविजेत्या इंग्लंडशी गाठ,परतफेड करण्यास सज्ज!
India vs Australia, St Lucia weather report
आज पावसाची शक्यता किती टक्के? IND vs AUS सामना पावसाने वाहून गेला तर विश्वचषकाची उपांत्य फेरी कोण गाठणार?
Olympic Games Paris 2024 How new sports get included in the Olympics
कबड्डी, खोखोचे सामने ऑलिम्पिकमध्ये रंगणार? नवे खेळ कसे सामील केले जातात?

तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे भारत आणि पाकिस्तान हे संघ आता केवळ ‘आयसीसी’च्या जागतिक स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. त्यामुळे या सामन्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. त्यातच या स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाला आपल्या पहिल्या सामन्यात अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागल्याने त्यांच्यासाठी या सामन्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. पाकिस्तानसाठी या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे झाले आहे. भारताने आपल्या सलामीच्या लढतीत अपेक्षित कामगिरी करताना आयर्लंडला पराभूत केले होते. आता त्यांचा कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न असेल.

हेही वाचा >>>T20 WC 2024: आफ्रिकेला डेव्हिड मिलरने तारलं; नेदरलॅंड्स विरूध्द निसटता विजय

या बहुप्रतीक्षित सामन्यापूर्वी नसाऊ कौंटी स्टेडियमच्या ‘ड्रॉप इन’ खेळपट्टीबाबतही बरीच चर्चा केली जात आहे. या खेळपट्टीचा अंदाज बांधणे अवघड असल्याचे भारताचा कर्णधार रोहित शर्मा आयर्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर म्हणाला होता. त्यावेळी खेळपट्टीवर अतिरिक्त गवत ठेवण्यात आले होते. तसेच खेळपट्टीला भेगाही असल्याने चेंडूला अतिरिक्त उसळी मिळत होती. त्यामुळे फलंदाजी करणे अत्यंत अवघड झाले होते. रोहितच्या खांद्याला आणि ऋषभ पंतच्या कोपराला चेंडू लागला होता. त्यानंतर ‘आयसीसी’ने खेळपट्टीवरील गवत कमी करण्याची सूचना येथील क्युरेटरना (खेळपट्टी देखरेखकार) केली. मात्र, आता भारत-पाकिस्तान सामन्यासाठी कशाप्रकारची खेळपट्टी वापरली जाते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. भारतासाठी जमेची बाजू म्हणजे त्यांनी आयर्लंडविरुद्धचा साखळी सामना आणि त्यापूर्वी बांगलादेशविरुद्ध सराव सामना न्यूयॉर्कच्या नसाऊ स्टेडियममध्येच खेळला होता. याउलट पाकिस्तानचा या मैदानावर हा पहिलाच सामना असणार आहे. डॅलास येथे झालेल्या सामन्यात अमेरिकेकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान संघ गुरुवारी न्यूयॉर्कला पोहोचला. त्यामुळे येथील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी त्यांना केवळ तीन दिवस मिळाले आहेत. याचा फायदा करून घेत सलग दुसरा विजय नोंदवण्याचा भारतीय संघाचा मानस असेल.

हेही वाचा >>>आझम खान: घराणेशाहीचा आरोप होणारा वजनदार कार्यकर्ता का होतो ट्रोल?

ट्वेन्टी-२० विश्वचषकात आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहितसह विराट कोहलीने भारताच्या डावाची सुरुवात केली. ‘आयपीएल’मध्ये दमदार कामगिरी करून आलेल्या कोहलीला फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. मात्र, २०२२ च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात कोहलीने पाकिस्तानविरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर केलेली उत्कृष्ट खेळी आजही प्रत्येक क्रिकेटप्रेमीला लक्षात आहे. आता अशीच काही खास कामगिरी करण्याचा त्याचा मानस असेल. रोहितने आयर्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावत आपल्याला लय मिळाल्याचे दाखवून दिले. या दोघांवर भारताची भिस्त असेल. मधल्या फळीत ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. भारतीय संघ पुन्हा जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज या तीनही वेगवान गोलंदाजांना खेळवण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानच्या फलंदाजांची कसोटी

अमेरिकेविरुद्धच्या मोहम्मद रिझवान, उस्मान खान आणि फखर झमान हे फलंदाज झटपट माघारी परतले होते. आता पाकिस्तानच्या फलंदाजांना बुमरासारख्या अलौकिक दर्जाच्या गोलंदाजाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात त्यांची कसोटी लागेल. पाकिस्तानची मदार पुन्हा बाबर आझमवरच असेल. बाबरने अमेरिकेविरुद्ध ४३ चेंडू खेळताना केवळ ४४ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याने आपला स्ट्राईक रेट वाढवणे गरजेचे आहे. वेगवान गोलंदाजी ही पाकिस्तानची सर्वांत भक्कम बाजू आहे. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तानसाठी शाहीन आफ्रिदी, मोहम्मद आमीर, नसीम शाह आणि हॅरिस रौफ हे वेगवान गोलंदाज निर्णायक भूमिका बजावू शकतील.

ट्वेन्टी-२० विश्वचषकात आमनेसामने ●एकूण : ७ ●भारत विजयी : ६ ●पाकिस्तान विजयी : १- वेळ : रात्री ८ वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, हॉटस्टार अॅप