ऑस्ट्रेलियाचे जेतेपदाचे स्वप्न विंडीज धुळीस मिळवणार?

आव्हान संपुष्टात आलेला गतविजेता विंडीजचा संघ त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त करण्यासाठी उत्सुक आहे

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी दुपारी होणाऱ्या निर्णायक सामन्यात वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने येतील. ऑस्ट्रेलियाला यंदा पहिल्यावहिल्या जेतेपदाचा शोध असला तरी आव्हान संपुष्टात आलेला गतविजेता विंडीजचा संघ त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त करण्यासाठी उत्सुक आहे, त्यामुळे चाहत्यांना रंगतदार लढत पाहायला मिळेल.

आरोन फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघात डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल असे दर्जेदार फलंदाज उपलब्ध असून फिरकीपटू अ‍ॅडम झॅम्पा त्यांच्यासाठी हुकुमी एक्का ठरत आहे. दुसरीकडे किरॉन पोलार्डच्या विंडीजला यंदा साजेशी कामगिरी करता आली नाही.मात्र पोलार्डसह ख्रिस गेल, आंद्रे रसेल आणि ड्वेन ब्राव्हो या नामांकित चौकडीला या लढतीत तरी प्रतिष्ठा जपण्यासाठी कामगिरी उंचवावी लागेल.

वेळ : दुपारी ३.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोट्र्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Twenty20 world cup cricket australia defending champions west indies akp

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या