दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन धक्कादायक चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर तो फ्रेंचायझी क्रिकेटमधून मनोरंजन करायचा, पण आता त्याने पूर्णपणे निवृत्ती घेण्याची घोषणा केली. त्याच्या या निर्णयाने चाहते खूपच निराश झाले आहेत. अनेकांनी ट्विटरवर सांगितले की, आम्हाला आणखी सामने पाहायचे आहेत, आम्हाला तुझी आठवण येईल. डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये आरसीबी संघासाठी खूप खेळला आहे. नेटकरी डिव्हिलियर्सच्या निर्णयावर भावूक झाले आहेत. आम्ही तुला मिस करू, अशा आशयाचे संदेश चाहत्यांनी ट्विटरवर दिले आहेत.

नेटकऱ्यांच्या ट्विटरवर प्रतिक्रिया

हेही वाचा – VIDEO: ‘‘मी आता अर्धा भारतीय आहे आणि मला..”, निवृत्तीनंतर डिव्हिलियर्सने काढलेले उद्गार ऐकून तुमचेही डोळे पाणावतील!

डिव्हिलियर्स आणि RCB

मागील तीन वर्षांपासून डिव्हिलियर्स त्याच्या राष्ट्रीय संघामधून खेळला नसला तरी तो आरसीबीसाठी खेळत होता. २०२१ च्या आयपीएलमध्ये तो आरसीबीसाठी १५ सामने खेळला. यामध्ये त्याने ३१.३० च्या सरासरीने ३१३ धावा केल्या. आयपीएलमध्ये त्याने एकूण ५ हजार १६२ धाव केल्या आहेत. तो आयपीएलचे १८४ सामने खेळला असून त्याची सरासरी ३९.७० इतकी आहे. त्याचा स्ट्राइक रेट १५१.६८ इतका आहे. या स्पर्धेच्या आतापर्यंतच्या सर्व पर्वांचा विचार केल्यास सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल २० खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे.