अरुणाचल प्रदेशचे सोरांग युमी व मासेलो मिहु यांची आशियाई ग्रां. प्रि. तिरदांजी स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा २६ जुलैपासून मंगोलियात आयेजित केली जाणार आहे.  भारतीय क्रीडा व युवक खात्याचे साहायक संचालक तिदार आपा यांनी ही माहिती दिली. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी एकासिनी देवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथील उदयोन्मुख खेळाडू गेनुंग टेकसिंग यांची पुण्यातील राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराकरिता निवड झाली आहे. हे शिबिर वीस दिवस चालणार आहे. या शिबिरातून विविध स्पर्धाकरिता भारतीय खेळाडूंची निवड केली जाणार आहे.