scorecardresearch

Premium

Wankhede Stadium: एम.एस. धोनीने विश्वचषक जिंकून देणारा षटकार ज्या बाकड्यांवर मारला होता, आता त्याचा MCA करणार लिलाव

MCA’s Wankhede Cricket Stadium: २०११ च्या विश्वचषक फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतासाठी एमएस धोनीने मारलेल्या शानदार षटकाराबद्दल आजही चाहते बोलतात. आता या षटकारांबाबत एक खास बातमीसमोर आली आहे.

Two seats where MS Dhoni's 2011 World Cup winning six was hit will be auctioned
एमएस धोनीचा वानखेडे स्टेडियमवरील विश्वचषक विजेता षटकार (फोटो संग्रहित छायाचित्र लोकसत्ता)

Mca To Auction 2 Seats Where Mahendra World Cup 2011 Winning Six Landed: भारत यंदा विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. याआधी, भारताने शेवटच्या वेळी विश्वचषकाचे आयोजन २०११ मध्ये केले होते, जेव्हा टीम इंडिया २८ वर्षांची प्रतीक्षा संपवून चॅम्पियन बनली होती. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीने मारलेला विजयी षटकार चाहत्यांच्या अजूनही लक्षात आहे. महेंद्रसिंग धोनीने मारलेला विजयी षटकाराचा चेंडू ज्या बाकड्यांवर पडला होता, आता त्या बाकड्यांचा लिलाव होणार आहे.

दोन्ही बाकड्यांवर धोनीचे नाव टाकले जाणार –

भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामन्यातील ४९ वे षटक टाकण्यासाठी चेंडू नुवान कुलसेकरा आला होता. षटकातील दुसऱ्याच चेंडूवर धोनीने त्याच्याच शैलीत षटकार ठोकला. धोनीच्या षटकाराचा चेंडू ज्या दोन बाकड्यावर पडला त्यांना ‘२०११ वर्ल्ड कप मेमोरियल सीट्स’ म्हणतात. असाच अहवाल यावर्षी एप्रिलमध्ये आला होता. या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपसाठी त्या बाकड्यांचा लिलाव करणार असल्याची माहिती एमसीएच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. जे लोक लिलाव जिंकतील त्यांना विशेष आदरातिथ्य पॅकेज दिले जाईल. वृत्तांवर विश्वास ठेवला तर या दोन बाकड्यांची किंमत करोडोंपर्यंत पोहोचू शकते.

IND vs AUS 3rd ODI Match Updates
VIDEO: उष्णतेमुळे दमलेल्या स्टीव्ह स्मिथने बसण्यासाठी मैदानातच मागवली खुर्ची, विराट कोहलीने घेतली मजा
IND vs AUS: Maybe Chahal had a fight with someone in the team Harbhajan's shocking statement said this about Ashwin
Harbhajan Singh: “कदाचित चहलचे संघातील कोणाशी भांडण…’, हरभजनचे धक्कादायक विधान, अश्विनबाबतही केला खुलासा
ireland apologizes for ads during ind vs ire t20 match dublin
भारत-आयर्लंड सामन्यात अश्लील मजकूर असणाऱ्या वेबसाईटची जाहिरात; आयर्लंडची बिनशर्त माफी!
IND vs BAN: Big changes in Team India against Bangladesh Along with Shami, three more players will get a chance in the playing XI
IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात होणार मोठे बदल; शमीसह आणखी तीन खेळाडूंना प्लेईंग ११मध्ये मिळणार संधी

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांनी सांगितले की, बाकड्यांवर कोणतेही स्मारक होणार नाही. या सीट्स एस धोनीच्या नावाने डिझाइन केल्या जातील आणि कायमचे एमएस धोनी सीट्स म्हणून ओळखले जातील. या बाकड्यांना सुशोभित करण्यात येणार असून या जागा सोफ्यासारख्या असतील. या सीटसाठी तुम्हाला खूप पैसे मोजावे लागतील.

हेही वाचा – SL vs PAK: पावसाने वाढवली पाकिस्तान-श्रीलंका संघाची धाकधूक, सामना रद्द झाल्यास कोण जाणार फायनला? जाणून घ्या समीकरण

सचिन तेंडुलकरच्या स्टँडमधील विकले जाणार बाकडे-

वर्ल्ड कप २०२३ साठी, एमसीए सचिन तेंडुलकरच्या लेव्हल डी च्या ३०० बाकडे ३ कोटी रुपयांना विकत आहे, तसेच सात बॉक्सच्या १४० सीट्स २.६६ कोटी रुपयांना विकणार आहे. विश्वचषकाचे पाच सामने मुंबईतील वानखेडे येथे होणार आहेत. गेल्या वेळी अंतिम सामना वानखेडेवर खेळला गेला होता, परंतु यावेळी विजेतेपदाचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two seats where ms dhonis 2011 world cup winning six was hit will be auctioned in wankhede cricket stadium vbm

First published on: 14-09-2023 at 15:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×