scorecardresearch

युक्रेन फुटबॉल संघाचे मैदानावर पुनरागमन

रशियन सैन्याने २४ फेब्रुवारीला युक्रेनवर आक्रमण केल्यापासून तेथील फुटबॉल स्पर्धाही बंद आहेत.

एपी, मोन्चेनग्लाडबाग (जर्मनी)

रशियाने केलेल्या आक्रमणानंतर युक्रेनमधील जनजीवन विस्कळीत झाले. खेळांच्या सर्व स्पर्धाही स्थगित करण्यात आल्या होत्या, मात्र दोन महिन्यांहून अधिकच्या कालावधीनंतर युक्रेनच्या पुरुष फुटबॉल संघाचे मैदानात पुनरागमन झाले आहे.

युक्रेनच्या संघाने बुधवारी जर्मन क्लब बुरुशिया मोन्चेनग्लाडबागला मैत्रीपूर्ण सामन्यात २-१ असे नमवले. त्यांच्याकडून मिखाइलो मुद्रिक आणि ओलेक्सांडर पिखालोन्को यांनी गोल केले. पुढील महिन्यात युक्रेनचा ‘फिफा’ विश्वचषक पात्रता फेरीत स्कॉटलंडशी सामना होणार आहे.

रशियन सैन्याने २४ फेब्रुवारीला युक्रेनवर आक्रमण केल्यापासून तेथील फुटबॉल स्पर्धाही बंद आहेत. या स्पर्धेत खेळणाऱ्या क्लबमधील खेळाडूंचा मैत्रीपूर्ण सामन्यासाठी युक्रेनच्या संघात समावेश करण्यात आला होता. युद्ध अजूनही सुरू असल्याने युक्रेनमधील प्रौढ पुरुषांना देशाबाहेर जाण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र, या सामन्यात खेळता यावे यासाठी त्यांना विशेष परवानगी देण्यात आली.

या सामन्यासाठी २० हजार प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित होते. तिकिटांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आले नाही. सामन्यापूर्वी युक्रेनचे राष्ट्रगीतही लावण्यात आले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ukraine football team returns to field for first time since russia war zws

ताज्या बातम्या