scorecardresearch

BCCI WC Plan: धवन वर्ल्ड कपसाठी बॅकअप प्लॅन! अनफिट बुमराहसाठी दिला उमरान मलिकचा बळी? सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप

बीसीसीआयने रविवारी रात्री उशिरा केंद्रीय करारांची यादी जाहीर केली, ज्यामध्ये अनफिट जसप्रीत बुमराहचा A+ यादीत समावेश केला असून मलिकला मात्र संपूर्ण करारातून बाहेर केले आहे.

BCCI WC Plan: As Umran Malik’s place got sacrificed for unfit Bumrah Fans are outraged on social media
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी, २६ मार्च रोजी केंद्रीय कराराची घोषणा केली, जी २०२२-२३ साठी लागू होतील. बीसीसीआयने ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत खेळाडूंशी करार केला आहे. यावेळी विविध श्रेणींमध्ये एकूण २६ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ही संख्या २७ होती आणि त्यापूर्वी ही यादी २८ खेळाडूंची होती. गतवर्षीच्या आणि यंदाच्या वार्षिक कराराबद्दलच बोलायचे झाले तर, २०२१-२२ च्या केंद्रीय कराराचा भाग असलेल्या ७ खेळाडूंना त्यात स्थान मिळालेले नाही.

बीसीसीआयच्या या करारामध्ये एक चांगली गोष्ट दिसून आली आहे की संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे, जो C श्रेणीचा भाग आहे, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात वादळी वेगवान गोलंदाज उमरान मलिकची निवड करण्यात आलेली नाही, ऑक्टोबरपासून. २०२२, भारताने आतापर्यंत सुमारे डझनभर आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एका मोसमात किमान ३ T20I सामने खेळलेल्या खेळाडूला त्यात स्थान देण्यात आल्याचे मीडिया रिपोर्ट्स प्रथमच पाहण्यात आले आहेत, परंतु त्यातून बाहेर पडलेल्या उमरान मलिकच्या बाबतीत असे दिसून आले नाही.

हेही वाचा: PAK vs AFG: ‘अगर हमारे पठान भाई और हम लोग…’ रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने पाकिस्तानच्या पराभवावर चोळले मीठ

उमरानची निवड का केली नाही?

भारतीय संघ सध्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या तयारीत आहे. जसप्रीत बुमराह संघासाठी ही स्पर्धा खेळू शकणार नसल्याचीही माहिती आहे. अशा परिस्थितीत सतत खेळणाऱ्या उमरान मलिकला या यादीत स्थान मिळायला हवे होते. मात्र, त्यांना संधी मिळणार नाही, असे नाही. तरीही त्याची संघात निवड होऊ शकते, मात्र त्याला फक्त मॅच फी दिली जाईल. यावर चाहत्यांनी बीसीसीआयच्या या निर्णयावर संताप व्यक्त करत ट्रोल केले आहे. अनफिट बुमराह एकही सामना न खेळता आणि पुढे खेळणार आहे की नाही हे माहिती देखील नसताना त्याला A+ यादीत ठेवणे आणि उमरानला संपूर्ण करारातून वगळणे ही कितपत योग्य आहे? असा प्रश्न ट्वीटर विचारला जात आहे. काहीजण तर जसप्रीत बुमराहसाठी उमरान मलिकचा बळी दिला जात आहे असही काही चाहते म्हणत आहेत.

शिखर धवनला C ग्रेडमध्ये ठेवले

बीसीसीआयच्या नव्या करारावर नजर टाकली, तर अनेक दिवसांपासून संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या शिखर धवनला ‘C’ ग्रेडमध्ये स्थान देण्यात आले आहे. धवन, जो २०१८ नंतर एकही कसोटी खेळला नाही, तो जवळजवळ एकाच वेळी टी२० फॉरमॅटमधून बाहेर पडत आहे. यासोबतच त्याचे वनडे फॉरमॅटमधील स्थान आता शुबमन गिल आणि इशान किशन यांना देण्यात आले आहे. २०२३ विश्वचषक पाहता, बोर्डाने तयारीसाठी नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत धवनचा समावेश केलेला नाही. अशा परिस्थितीत बोर्ड आता धवनला आपल्या योजनेचा एक भाग मानत नसल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे त्याला सी ग्रेडमध्ये ठेवणे हा अनाकलनीय निर्णय आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 14:11 IST

संबंधित बातम्या