Undisputed dominance India A team due to Shardul Thakur match victory ysh 95 | Loksatta

शार्दूलमुळे भारत-अ संघाचे निर्विवाद वर्चस्व

मुंबईकर शार्दूल ठाकूरची (३३ चेंडूंत ५१ धावा) आक्रमक खेळी आणि युवा अष्टपैलू राज अंगद बावाच्या (४/११) प्रभावी माऱ्याच्या जोरावर भारत-अ संघाने मंगळवारी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड-अ संघावर १०६ धावांनी विजय मिळवला.

शार्दूलमुळे भारत-अ संघाचे निर्विवाद वर्चस्व
शार्दूल ठाकूर

चेन्नई : मुंबईकर शार्दूल ठाकूरची (३३ चेंडूंत ५१ धावा) आक्रमक खेळी आणि युवा अष्टपैलू राज अंगद बावाच्या (४/११) प्रभावी माऱ्याच्या जोरावर भारत-अ संघाने मंगळवारी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड-अ संघावर १०६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारत-अ संघानेही तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारत-अ संघाने ४९.३ षटकांत २८४ धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसन (५४) आणि तिलक वर्मा (५०) यांनी अर्धशतकी खेळी केल्या. मात्र, अखेरच्या षटकांत शार्दूलने केलेली फटकेबाजी भारतासाठी महत्त्वाची ठरली. शार्दूलने ३३ चेंडूंत ५१ धावा करताना चार चौकार आणि तीन षटकार लगावले.

आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड-अ संघाचा डाव ३८.३ षटकांत १७८ धावांतच आटोपला. डेन क्लेवर (८३) आणि चॅड बोवेस (२०) यांनी अर्धशतकी सलामी दिली. मात्र, त्यानंतर राज बावाच्या गोलंदाजीपुढे न्यूझीलंडचा डाव गडगडला. चार गडी बाद करणाऱ्या राज बावाला राहुल चहर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत चांगली साथ दिली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची स्पेनशी सलामी

संबंधित बातम्या

IND vs BAN 1st ODI: भारतासमोर आज बांगलादेशचे आव्हान, जाणून घ्या पहिली वनडे कधी आणि कुठे बघायला मिळणार
Video: तू गल्ली क्रिकेट…; ऋषभ पंतने हर्षा भोगलेंना दिलेलं ‘ते’ उत्तर ऐकून नेटकरी भडकले, पाहा ट्वीट्स
सलामीला शिखर धवन की केएल राहुल?
अपराजित्व राखण्यात ब्राझील अपयशी; सर्बियाचा बचाव भेदत स्वित्झर्लंड बाद फेरीत
VIDEO : आधी लगीन वर्ल्डकपचं, मग…! भारताच्या ‘लॉर्ड’नं केला साखरपुडा; मराठमोळी गर्लफ्रेंड बनली आयुष्याची जोडीदार!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Video: भयंकर! चालत्या बसमध्ये चालकाला आला हार्ट अटॅक; नियंत्रण सुटल्याने बस प्रत्येकाला उडवत सुटली अन…
‘या’ सवयींमुळे वाढू शकतो मधुमेह होण्याचा धोका; वेळीच व्हा सावध
पुणे: कमी पटसंख्येच्या शाळा बंद नाही करण्यात येणार नाही; शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची स्पष्टोक्ती
Exclusive Video : गोष्ट पुण्याची भाग- ५८ : हजारो वर्षांपूर्वी भारतात आलेल्या बेनेइस्राइल समाजाचे प्रार्थनालय
तुमच्या आडनावाचा महाराष्ट्राशी संबंध आहे का? अनुपम खेर यांनी उत्तर देत सांगितला ‘खेर’चा इतिहास, म्हणाले, “गाढव…”