scorecardresearch

Viral झालाय भारतीय फुटबॉलपटूंचा ‘हा’ फोटो; कारण वाचून तुम्हालाही वाटेल देशाचा अभिमान

मनवीर सिंग, वीपी सुहैर, होर्मिपम रुइवा अशी या फोटोमध्ये दिसणाऱ्या खेळाडूंची नावं आहेत.

Indian Football
हा फोटो चर्चेचा विषय ठरतोय (फोटो सौजन्य- Twitter/IndianFootball)

बहरिनच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय फुटबॉल संघाचा दौरा निराशाजनक राहिला. बेलारूसच्या संघांविरुद्ध झालेल्या मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यामध्ये भारताचा ०-३ ने पराभव झाला. मात्र असं असलं तरी सोशल मीडियावर बारतीय संघाचं फार कौतुक होताना दिसत आहे. यासाठी कारण ठरलाय भारताच्या तीन स्टार खेळाडूंचा फोटो. सामना सुरु होण्याआधीची हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.

भारताचे तीन महत्वाचे खेळाडू सामना सुरु होण्यापूर्वी मैदानात प्रवेश करण्याआधी आपआपल्या धर्माप्रमाणे देवाची प्रार्थना करताना दिसत आहेत. यामध्ये एक खेळाडू मुस्लीम, एक ख्रिश्चन तर एक हिंदू पद्धतीने हात जोडून प्रार्थना करताना दिसतोय. हा फोटो तसा २६ तारखेला भारतीय फुटबॉल संघाच्या अधिकृत खात्यांवरुन इतर काही फोटोंबरोबर पोस्ट करण्यात आला होता. पण आता हा फोटो व्हायरल झालाय. मनवीर सिंग, वीपी सुहैर, होर्मिपम रुइवा अशी या फोटोमध्ये दिसणाऱ्या खेळाडूंची नावं आहेत.

भारतामधील राष्ट्रीयत्वाची भावना आणि सर्वधर्म समभाव जपणारा हा फोटो असल्याच्या कॅप्शनसहीत सध्या तो व्हायरल होतोय. हा फोटो खरोखरच अभिमानास्पद असल्याचं मत अनेकांनी सोशल मीडियावरुन व्यक्त केलंय. या फोटोमधून विविधतेमध्ये एकता हा संदेश जगभरात पोहचवला जातोय याबद्दलही अनेकांनी समाधान व्यक्त केलंय.

हा मूळ फोटो व्हायरल झाला नसला तरी इतर अनेक खात्यांवरुन फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Unity in diversity this photo of indian footballers praying together ahead of belarus match is winning internet scsg