नवी दिल्ली : उदयोन्मुख बॅडिमटनपटू उन्नत्ती हुडाची चालू वर्षांतील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात निवड झाली आहे. भारतीय बॅडिमटन संघटनेने आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसह थॉमस-उबेर चषकासाठी भारतीय संघाची घोषणा गुरुवारी केली.
इंदिरा गांधी राष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सहा दिवसांच्या निवड चाचणी स्पर्धेतील कामगिरीआधारे हा संघ निवडण्यात आला आहे. पी. व्ही. सिंधूवर राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत मदार असेल. पुरुषांमध्ये लक्ष्य सेन, किदम्बी श्रीकांत यांच्यावर संघाची धुरा आहे.
भारतीय संघ :
• राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : पुरुष : लक्ष्य सेन, किदम्बी श्रीकांत, सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी, चिराग शेट्टी आणि बी. सुमीत रेड्डी; महिला : पी. व्ही. सिंधू, आकर्षी कश्यप, त्रिसा जॉली, गायत्री पी., अश्विनी पोनप्पा
• आशियाई क्रीडा स्पर्धा आणि थॉमस-उबेर चषक : पुरुष : लक्ष्य सेन, किदम्बी श्रीकांत, एचएस प्रणॉय, प्रियांशू राजावत, चिराग शेट्टी, सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी, ध्रुव कपिला, एमआर अर्जुन, विष्णू वर्धन गौड, कृष्ण प्रसाद गारिगा; महिला : पी. व्ही. सिंधू, आकर्षी कश्यप, अश्मित चलिहा, उन्नत्ती हुडा, त्रिसा जॉली, गायत्री पी, एन. सिक्की रेड्डी, अश्विनी पोनप्पा, तनिषा क्रॅस्ट्रो आणि श्रुती मिश्रा
