शिवाजी पार्क जिमखान्याच्या अध्यक्षपदी प्रवीण अमरे यांची बिनविरोध निवड

१३ आणि १४ नोव्हेंबरला होणाऱ्या या निवडणुकीसाठी अमरे-जोशी गटापुढे खानोलकर-मुरकर गटाचे कडवे आव्हान असेल.

शिवाजी पार्क जिमखान्याच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे (अमरे आणि अनिरुद्ध जोशी गट) यांची बिनविरोध निवड झाली आहे. येत्या १३ आणि १४ नोव्हेंबरला होणाऱ्या या निवडणुकीसाठी अमरे-जोशी गटापुढे खानोलकर-मुरकर गटाचे कडवे आव्हान असेल.

प्रतिष्ठेच्या विश्वस्त पदासाठी अमरे-जोशी गटाकडून लता देसाई, प्रकाश नायक, मिलिंद सबनीस, तर खानोलकर-मुरकर गटाकडून विकास दुबेवार, हेमंत परब, केवल रंका  रिंगणात आहेत. उपाध्यक्षपदासाठी अमरे-जोशी गटाने विक्रम पटवर्धन, विलास साळुंखे, अमर तेंडुलकर यांना, तर खानोलकर-मुरकर गटाने व्हिक्टर शेट्टीयार, विजयसेन पाठारे, समीर पेठे यांना उमेदवारी दिली आहे. कार्याध्यक्षपदासाठी पुष्कराज चव्हाण आणि दीपक मुरकर यांच्यात सामना होईल. तर उपकार्याध्यक्षपदासाठी विश्वास नेरुरकर (अमरे-जोशी गट) आणि शरदचंद्र देसाई (खानोलकर-मुरकर) अशी झुंज रंगेल. सरचिटणीसपदासाठी अनिरुद्ध जोशी यांच्यापुढे विद्यमान संजीव खानोलकर यांचे आव्हान असेल. कोषाध्यक्षपदासाठी विलास सोमण (अमरे-जोशी गट) यांची फाल्गुन देसाई (खानोलकर-मुरकर) यांच्याशी लढत होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Unopposed election of praveen amare as president of shivaji park gymkhana akp

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या