चेन्नई सुपर किंग्स संघाने आपल्या घरच्या मैदानावर खेळताना लखनौ सुपर जायंट्स संघाला पराभवाची धूळ चारली आहे. चेपॉकच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाला विजयासाठी २०४ धावांचे आव्हान मिळाले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना युवा फलंदाज उर्विल पटेल हा लखनौच्या विजयाचा हिरो ठरला. अवघ्या १३ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत त्याने या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं. त्याने अवघ्या २३ चेंडूत वेगवान ६५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक

चेन्नईला हा सामना जिंकण्यासाठी वेगवान सुरुवातीची गरज होती. ही सुरुवात उर्विल पटेलने करून दिली. आधी आवेश खानच्या षटकात षटकारांची हॅट्ट्रिक केली. त्यानंतर दिग्वेश राठीच्या षटकात लागोपाठ षटकार खेचून त्याने लखनौच्या गोलंदाजांवर दबाव टाकला. यादम्यान त्याला युवराज सिंगचा वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड मोडण्याची संधी होती. पण हा रेकॉर्ड थोडक्यात हुकला. पण १३ चेंडूत अर्धशतक पूर्ण करून त्याने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं. या रेकॉर्डमध्ये त्याने यशस्वी जैस्वालची बरोबरी केली. जैस्वालने देखील १३ चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.

उर्विल पटेलने मोडला एबी डिव्हिलियर्सचा रेकॉर्ड

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत अनेक आक्रमक फलंदाज होऊन गेले आहेत. पण उर्विल पटेलने असं काही करून दाखवलं आहे, जे याआधी कोणालाच जमलेलं नाही. उर्विल पटेल हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील पहिलाच असा फलंदाज ठरला आहे, ज्याने आपल्या डावातील सुरुवातीच्या ८ चेंडूंमध्ये ६ षटकार खेचले आहेत. यासह उर्विल पटेल हा आयपीएल स्पर्धेतील सुरुवातीच्या १० चेंडूत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने १० चेंडूत ४१ धावा केल्या. याआधी एबी डिव्हिलियर्सने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात १० चेंडूत ४१ धावा केल्या होत्या.

चेन्नईचा दमदार विजय

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्स संघाकडून जोस इंग्लिसने सर्वाधिक ८५ धावांची खेळी केली. तर शाहबाझ अहमदने नाबाद ४३ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या २०३ धावांवर पोहोचवली. या धावांचा पाठलाग करताना चेन्नईकडून उर्विल पटेलने सर्वाधिक ६५ धावा केल्या. तर ऋतुराज गायकवाडने ४२ धावांची खेळी करून चेन्नईला ५ गडी राखून विजय मिळवून दिला.