न्यूयॉर्क : हंगामातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असणाऱ्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मानांकित खेळाडूंनीच बाजी मारली. पुरुषांमध्ये दुसरा मानांकित नोव्हाक जोकोविच, तर महिलांमध्ये दुसरी मानांकित अरिना सबालेन्का आणि तिसरी मानांकित कोको गॉफ यांनी पहिल्या फेरीचा अडथळा सहजपणे पार केला.

ऐतिहासिक २५वे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या जोकोविचने अमेरिकन स्पर्धेतील आपल्या मोहिमेस धडाक्यात सुरुवात केली. जोकोविचने पात्रता फेरीतून आलेल्या माल्दोवाच्या रॅडू अल्बोटचा ६-२, ६-२, ६-४ असा सहज पराभव केला. दोन अमेरिकन खेळाडूंमध्ये झालेल्या पहिल्या फेरीच्या लढतीत २०व्या मानांकित फ्रान्सिस टिआफोने अॅलेक्सांडर कावोसेविचला ६-४, ६-३, ४-६, ६-५ असे नमवले.

ENG vs AUS Liam Livingstone smashed 28 runs in a over of Mitchell Starc video viral
IPL मध्ये एका हंगामात २४ कोटी कमावणाऱ्या मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीच्या ठिकऱ्या; लिव्हिंगस्टोनने ६ चेंडूत चोपल्या २८ धावा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
India grandmaster chess player D Gukesh expressed that he did not even think about it during the chess Olympiad sport news
ऑलिम्पियाड स्पर्धेदरम्यान जगज्जेतेपदाच्या लढतीचा विचारही नाही -गुकेश
Praveen Thipse Opinion on Chess Olympiad Gold Medal sport news
ऑलिम्पियाड जेतेपदाला ऑलिम्पिक सुवर्णपदकाचेच तेज! ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांचे मत
jannik sinner defeats taylor fritz in straight sets to win us open 2024 men title
सिन्नेरला जेतेपद : पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात फ्रिट्झवर सरळ सेटमध्ये विजय
us open 2024 aryna sabalenka beats jessica pegula in final to win third grand slam
सबालेन्काला विजेतेपद; महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या पेगुलावर मात
Paris Paralympics 2024 India Medal Tally in Marathi
Paralympics 2024: ७ सुवर्ण, एकूण २९ पदकांसह पॅराखेळाडूंची पॅरिस मोहीम फत्ते
Neeraj chopra qualified for the Diamond League Finals sport news
नीरज डायमंड लीग अंतिम फेरीसाठी पात्र

हेही वाचा >>> पॅरालिम्पिकमध्ये विदर्भाच्या ज्योतीचा सहभाग

महिला एकेरीत अमेरिकेच्या गतविजेत्या कोको गॉफने फ्रान्सच्या व्हरव्हरा ग्राशेवाचा ६६ मिनिटांत ६-२, ६-० असा फडशा पाडला.

जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जाणाऱ्या सबालेन्काने ऑस्ट्रेलियाच्या प्रिसिल्ला हॉनचा ६-३, ६-३ असा पराभव केला. एलिना स्विटोलिनाने मारिया लॉर्ड्रेस कार्लेला ३-६, ६-३, ६-४ असे पराभूत केले. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या चीनच्या झेंग क्विनवेनने आपली लय कायम राखताना अमांडा अॅनिसिमोवाचा ४-६, ६-४, ६-२ पराभव केला.

नागलचे आव्हान संपुष्टात

एकेरीतील भारताचा एकमेव खेळाडू असलेल्या सुमित नागलला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. नेदरलँड्सच्या टॅलन ग्रिकस्पूरने सुमितचा ६-१, ६-३, ७-६ (८-६) असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सुमितला पहिल्या दोन सेटमध्ये फारशी झुंज देता आली नाही. तिसऱ्या सेटमध्ये त्याने प्रतिकार केला, पण टायब्रेकरमध्ये तो पराभूत झाला.