ंवृत्तसंस्था, न्यूयॉर्क
अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची तिसरी फेरी टेलर फ्रिट्झ, फ्लाविओ कोबोली, मेडिसन कीज या प्रमुख टेनिसपटूंच्या पराभवामुळे धक्कादायक ठरली. यातही मेडिसन कीजचा पराभव चटका लावणारा ठरला. बिगरमानांकित किनवेन झेंग हिने २ तास २८ मिनिटांच्या झुंजीनंतर अक्षरश: विजयाचा घास मेडिसनच्या तोंडून हिरावून घेतला. त्याचवेळी महिला एकेरीत कोको गॉफ, इगा श्वीऑटेक, मीरा आंद्रिवा तर, पुरुष एकेरीत ॲलेक्झांडेर झ्वेरेव यांनी सहज विजय मिळवून चौथ्या फेरीत प्रवेश केला.
झेंगविरुद्ध निर्णायक सेटमध्ये
५-० अशा आघाडीनंतर मॅच पॉइंटवर असताना अनपेक्षितपणे कीजचे सामन्यावरील नियंत्रण सुटले आणि तिला पराभवाचा सामना करावा लागला. झेंग हिने अखेरच्या निर्णयाक सेटमध्ये सलग सात गेम जिंकून लढत १-६, ७-६ (७-३), ७-५ अशी जिंकली. हा सामना २ तास २८ मिनिटे चालला. पहिला सेट सहज जिंकत मेडिसनने आश्वासक सुरुवात केली होती. मात्र, कोपरावरील शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करणार्या७ झेंगने जोरदार खेळ करताना दुसरा सेट टायब्रेकरमध्ये जिंकला आणि त्यानंतर मेडिसनला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. एक नाट्यमय विजय एवढीच प्रतिक्रिया झेंग हिने व्यक्त केली. अमेरिकन स्पर्धेत चौथ्या फेरीपर्यंत मजल मारणारी झेंग ही पात्रता फेरीतून आलेली पहिली खेळाडू ठरली आहे. तिची गाठ आता इगा श्वीऑटेकशी पडणार आहे. तिने मेरी बुझ्कोवा हिचा ७-६ (७-३), ७-६ (७-३) असा पराभव केला.
गॉफ, ओसाकाचीही आगेकूच
महिला एकेरीत कोको गॉफ हिने क्रिस्तिना बुक्सा हिचा ६-३, ६-४ असा पराभव केला. तिची गाठ आता अमेरिकेच्याच १८ वर्षीय इवा जोविच हिच्याशी पडणार आहे. जोविचने येथील चाहत्यांची लाडकी असलेल्या फिलिपाईन्सच्या ॲलेक्स ईला हिचा ७-५, ३-६, ७-५ असा पराभव केला. तेराव्या मानांकित नाओमी ओसाका हिने एलिस मर्टेन्सवर ६-३, ३-६, ७-५ असा विजय मिळविला. निर्णायक सेटमध्ये ओसाका २-४ अशी पिछाडीवर होती. त्यानंतर पुनरागमन करत तिने विजयावर शिक्कामोर्तब केले.
पुरुष एकेरीत झ्वेरेवची चमक
पहिल्या दोन फेरीत विजय मिळविण्यासाठी तब्बल साडेनऊ तास खर्ची करणार्यां जर्मनीच्या ॲलेक्झांडर झ्वेरेवने तिसर्याा फेरीत अलहान्ड्रो ताबिलो याचा ६-२, ७-६ (७-२), ६-२ असा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला. आर्थर ॲश कोर्टवर नवव्या मानांकित टेलर फ्रिट्झला दोन सेट जिंकल्यानंतरही अर्जेंटिनाच्या फ्रान्सिस्को सेरुन्डोलोकडून ३-६, ४-६, ६-३, ६-४, ६-४ असा पराभव पत्करावा लागला. त्याची गाठ आता बेल्जियमच्या २१ वर्षीय ॲलेक्झांडर ब्लॉक्सशी पडणार आहे. त्याने पाचव्या मानांकित फ्लाविओ कोबोलीचा ६-७ (४-७), ६-३, ६-०, ६-३ असा पराभव केला. ब्लॉक्स कारकिर्दीत प्रथमच एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीपर्यंत पोहचला आहे.
युकी, अनिरुद्ध अपयशी
अमेरिकन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या युकी भाम्ब्री आणि अनिरुद्ध चंद्रशेखर यांना पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. अमेरिकेच्या रायन सेगेर्मन आणि प्रतिक त्राक जोडीकडून न्यूझीलंडचा मायकेल व्हिनस आणि युकी जोडीला ७-६ (७-४), ७-६
(७-३) असा पराभव पत्करावा लागला. अनिरुद्धने बेलारुसच्या इव्हान लिउतारेविचच्या साथीत जोडी जमवली होती. ब्रिटनच्या आर्थर फेरी आणि जोशुआ पॅरिस जोडीने अनिरुद्ध-इव्हान जोडीला ६-४, ५-७, ६-४ असे हरवले
