USA vs NED Live Updates: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील २१ वा सामना नेदरलँड्स आणि अमेरिका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने ६ गडी बाद १९६ धावा केल्या होत्या. दरम्यान धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या नेदरलँड्सचा डाव अवघ्या १०३ धावांवर आटोपला. याहस अमेरिकेने हा सामना ९३ धावांनी आपल्या नावावर केला.

Live Updates

Netherlands vs USA Highlights: नेदरलँड्स विरूद्ध अमेरिका सामन्याचे हायलाईट्स.

22:17 (IST) 13 Feb 2026

USA vs NED: अमेरिकेने घडवला इतिहास! नेदरलँड्सवर पहिल्यांदाच मिळवला सर्वात मोठा विजय

USA vs Netherlands: अमेरिका आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात अमेरिकेने ९३ धावांनी विजय मिळवला आहे. ...वाचा सविस्तर
21:52 (IST) 13 Feb 2026

USA vs NED Live: नेदरलँड्सचा संघ पराभवाच्या उंबरठ्यावर! ८ फलंदाज परतले माघारी

मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या नेदरलँड्सला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. नेदरलँड्सचे ८ फलंदाज माघारी परतले आहेत.

20:39 (IST) 13 Feb 2026

NED vs USA: अमेरिकेने नेदरलँड्ससमोर विजयासाठी ठेवलं इतक्या धावांचं आव्हान

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी अमेरिकेने नेदरलँड्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. अमेरिकेकडून फलंदाजी करताना मुक्कामल्लाने ७९ धावांची खेळी केली. तर रांजणेने ४८ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या ६ गडी बाद १९६ धावांवर पोहोचवली आहे.

20:15 (IST) 13 Feb 2026

USA vs NED LIVE: सैतेजा मुक्कामल्लाची तुफान फटकेबाजी! अमेरिकेची धावसंख्या १५० पार

अमेरिकेकडून फलंदाजी करताना सैतेजा मुक्कामल्लाने तुफान फटकेबाजी केली आहे. त्याने अर्धशतकी खेळी करून अमेरिकेची धावसंख्या १५० पार पोहोचवली आहे.

19:25 (IST) 13 Feb 2026

NED vs USA: अमेरिकेला पहिला मोठा धक्का! जहागीर परतला माघारी

अमेरिकेला पहिला मोठा धक्का बसला आहे. सलामीला आलेला जहागीर २० धावा करून माघारी परतला आहे.

IND vs USA T20 World Cup 2026 Match Timing When and Where to watch India vs United states Live

Netherlands vs USA Highlights: पाहा नेदरलँड्स विरूद्ध अमेरिका सामन्याचे हायलाईट्स.