वृत्तसंस्था, डॅलास

क्रिकेटविश्वात वेगळी ओळख निर्माण करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना मोठे बळ मिळाले आहे. मुंबईतील मैदानांवर क्रिकेटचे धडे गिरवलेल्या सौरभ नेत्रावळकरच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर अमेरिकेने यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पहिला धक्कादायक निकाल नोंदवताना माजी विजेत्या पाकिस्तानला ‘सुपर ओव्हर’मध्ये पराभूत केले. सह-यजमान असलेल्या अमेरिकेच्या संघाचा हा सलग दुसरा विजय ठरला. त्यामुळे त्यांनी ‘सुपर एट’ म्हणजेच अव्वल आठ संघांची फेरी गाठण्यासाठी दावेदारी भक्कम केली.

Kamran Akmal and Harbhajan Singh Video viral
WCL 2024 : शीख धर्माबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कामरान अकमल-हरभजन सिंग आमनेसामने, VIDEO व्हायरल
Taskin Ahmed was punished for sleeping
भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी झोपणं बांगलादेशच्या खेळाडूला पडलं महागात, संघाने दिली मोठी शिक्षा, आता मागतोय माफी
t20 cricket world cup final India vs south africa match preview
तुल्यबळांमध्ये वर्चस्वाची लढाई! ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या महाअंतिम लढतीत आज भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान
South Africa vs Afghanistan, T20 World Cup semi-final
T20 World Cup 2024 : दक्षिण आफ्रिकेला अफगाणिस्तान रोखणार?उपांत्य फेरीच्या लढतीत आज आमनेसामने
Mohammad Nabi part of wins against 45 nations For Afganistan
अफगाणिस्तानची प्रगती ‘याचि देही याचि डोळा’ पाहणारा मोहम्मद नबी, जागतिक क्रिकेटमधील अनोखा विक्रमवीर
taliban minister talk to rashid khan
T20 World Cup : रशीद खानच्या शिलेदारांचं तालिबानी नेत्याने केलं कौतुक; अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने शेअर केला व्हिडीओ
Glenn Maxwell catch by Noor Ahmed in the Gulbadin Naib over
AFG vs AUS : ग्लेन मॅक्सवेलचा झेल ठरला अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक विजयाचा ‘टर्निंग पॉइंट’, VIDEO होतोय व्हायरल
Babar Azam Accused for Fixing in PAK vs USA Match Watch Video
T20 WC 2024: अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात बाबर आझमने केलं फिक्सिंग? पाकिस्तानमधल्या ज्येष्ठ पत्रकाराचा आरोप; VIDEO व्हायरल

एकीकडे गतउपविजेता पाकिस्तानचा संघ, दुसरीकडे क्रिकेट विश्वचषकात प्रथमच खेळणारा अमेरिकेचा संघ. या दोन संघांमध्ये साहजिकच पाकिस्तानचे पारडे जड मानले जात होते. पाकिस्तानचा संघ हा सामना सहजपणे जिंकून भारताविरुद्धच्या सामन्यासाठीची आपली सज्जता सिद्ध करेल अशीच सर्वांना अपेक्षा होती. मात्र, अमेरिकेच्या संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभागांत पाकिस्तानपेक्षा सरस कामगिरी करताना ऐतिहासिक विजयाची नोंद केली. विश्वचषक स्पर्धांमध्ये तुलनेने दुबळ्या मानल्या जाणाऱ्या संघाकडून पराभूत होण्याची पाकिस्तानची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी पाकिस्तानला २००७च्या एकदिवसीय विश्वचषकात आयर्लंड, तर २०२२च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात झिम्बाब्वेकडून पराभवाचा धक्का बसला होता.

हेही वाचा >>>T20 WC 2024 : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी हार्दिक पंड्याचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘IND vs PAK मॅच म्हणजे युद्ध…’

अमेरिकेत क्रिकेटचा प्रसार होण्याच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. डॅलास येथे झालेल्या या सामन्यात अमेरिकेने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीचे आमंत्रण दिले. डावखुरा फिरकीपटू नोस्तुश केन्जिगे (३/३०) आणि डावखुरा वेगवान गोलंदाज नेत्रावळकर (२/१८) यांच्या प्रभावी माऱ्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानला २० षटकांत ७ बाद १५९ धावांवर रोखले. कर्णधार बाबर आझम (४३ चेंडूंत ४४), शादाब खान (२५ चेंडूंत ४०) आणि शाहीन शाह आफ्रिदी (१६ चेंडूंत नाबाद २३) यांचा अपवाद वगळता पाकिस्तानचा एकही फलंदाज २० धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही.

प्रत्युत्तरात अमेरिकेनेही २० षटकांत ३ बाद १५९ धावाच केल्या. अमेरिकेकडून कर्णधार मोनांक पटेल (३८ चेंडूंत ५०), आरोन जोन्स (२६ चेंडूंत नाबाद ३६) आणि आंद्रिस गौस (२६ चेंडूंत ३५) यांनी चांगली फलंदाजी केली. अमेरिकेला अखेरच्या काही षटकांत धावांचा वेग राखता न आल्याचा फटका बसला. जोन्स आणि नितीश कुमार (१४ चेंडूंत नाबाद १४) यांना मिळून १७व्या सहा, १८व्या षटकात सात, १९व्या षटकात सहा धावाच करता आल्या. त्यामुळे अमेरिकेला विजयासाठी अखेरच्या षटकात १५ धावांची आवश्यकता होती. हॅरिस रौफने टाकलेल्या या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर केवळ तीन धावा निघाल्या. मात्र, चौथ्या चेंडूवर जोन्सने षटकार, तर अखेरच्या चेंडूवर नितीशने चौकार मारत अमेरिकेला बरोबरी करून दिली.

हेही वाचा >>>USA vs PAK : ‘एक ही दिल है कितनी बार तोड़ोगे…’, पाकिस्तानच्या पराभवानंतर संतापली चाहती, पीसीबीसह खेळाडूंनाही फटकारले, पाहा VIDEO

यानंतर झालेल्या ‘सुपर ओव्हर’मध्ये मोहम्मद आमीरचा स्वैर मारा आणि गचाळ क्षेत्ररक्षणाचा पाकिस्तानला मोठा फटका बसला. अमेरिकेने १८ धावा केल्या, ज्यापैकी आठ धावा अतिरिक्त होत्या. त्यानंतर नेत्रावळकरने दडपणाखाली आपला खेळ उंचावला. त्याने इफ्तिखार अहमदला बाद करताना पाकिस्तानला केवळ १३ धावा करू दिल्या.

आम्हाला सामना ‘सुपर ओव्हर’मध्ये जाऊ द्यायचा नव्हता. निर्धारित षटकांतच जिंकू असे आम्हाला वाटले होते. त्यानंतरही प्रेक्षकांमधून पाकिस्तानला मिळणारा प्रचंड प्रतिसाद आमच्या पथ्यावर पडला. यामुळे सर्व दडपण पाकिस्तानवर आले. या एका षटकात १८ धावा केल्यामुळे आमची बाजू भक्कम झाली. पूर्ण सामन्यात गोलंदाजांनी अचूक कामगिरी केली. – मोनांक पटेलअमेरिकेचा कर्णधार

संक्षिप्त धावफलक

पाकिस्तान : २० षटकांत ७ बाद १५९ (बाबर आझम ४४, शादाब खान ४०, शाहीन शाह आफ्रिदी नाबाद २३; नोस्तुश केन्जिगे ३/३०, सौरभ नेत्रावळकर २/१८) पराभूत वि. अमेरिका : २० षटकांत ३ बाद १५९ (मोनांक पटेल ५०, आरोन जोन्स नाबाद ३६, आंद्रिस गौस ३५; मोहम्मद आमीर १/२५, नसीम शाह १/२६, हॅरिस रौफ १/३७)

रौफवर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफने ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप अमेरिकेचा गोलंदाज रस्टी थेरॉनने केला आहे. थेरॉनला विश्वचषकाच्या संघात स्थान मिळालेलेला नाही. रौफने चेंडूला नखे मारली, त्यामुळे केवळ दोन षटके टाकून झालेला चेंडूही ‘रिव्हर्स स्विंग’ होत होता, असा आरोप थेरॉनने केला. याकडे दुर्लक्ष केल्याने थेरॉनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवरही (आयसीसी) टीका केली.

● सुपर ओव्हर : अमेरिका १ बाद १८ वि. पाकिस्तान १ बाद १३.