अवलिया धावपटूचा युनायटेडला सुखद धक्का

सीमारेषा पार केल्यानंतर एक हात उंचावून विजय साजरा करणारा जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट हा सगळ्यांच्या परिचयाचा आहे. मात्र, फुटबॉलचा चाहता असलेल्या बोल्टने मँचेस्टर युनायटेडचा विजय अनोख्या पद्धतीने साजरा करून सर्वाना आश्चर्यचकित केले.

[jwplayer itkTOSml]

युनायटेडने शनिवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत मिडल्स्ब्रॉग क्लबवर २-१ असा नाटय़मय विजय मिळवला. त्यानंतर युनायटेड येथील एका वाहिनीने क्लबच्या विजयाबद्दल चाहत्यांना दूरध्वनीवरून प्रतिक्रिया कळवण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत बोल्टने चक्क संबंधित वाहिनीला फोन केला आणि युनायटेडच्या विजयाचा आनंद साजरा केला. वाहिनीची निवेदिकाही बोल्टच्या दूरध्वनीमुळे थोडीशी गोंधळली. ‘तू उसेन बोल्ट होऊ शकत नाही, तू खरंच आहेस का?’ असा प्रतिसवाल बोल्टला केला. त्यावर ‘हो मी बोल्टच बोलतोय.’ असे उत्तर ऑलिम्पिक  सुवर्णपदक विजेत्या धावपटूने दिले.

बोल्ट पुढे म्हणाला की, ‘युनायटेडच्या आजच्या खेळाने जुन्या क्लबची आठवण करून दिली. त्यांनी पिछाडीवरून मुसंडी मारली आणि विजयासाठी कडवा संघर्ष केला. हीच युनायटेडची ओळख आहे. हा सामना सर्वोत्तम होता आणि युनायटेडच्या विजयाचा मला खूप आनंद आहे.’

[jwplayer 2LHpW07p]