Usain Bolt Latest Updates: कॅरेबियन देश जमैकाचा प्रसिद्ध खेळाडू उसेन बोल्ट आता कंगाल झाला आहे. त्यांची आयुष्यभराची कमाई आणि निवृत्तीचे पैसे अचानक गायब झाले. लंडन ते बीजिंगच्या रेस ट्रॅकवर धावणाऱ्या बोल्टसोबत जे काही घडलं त्यानं सगळ्यांनाच प्रचंड धक्का बसला आहे. त्याने ऑलिम्पिकमध्ये ८ वेळा सुवर्णपदक जिंकले आहे. निवृत्तीनंतर आता तो पुन्हा या प्रकरणामुळे चर्चेत आला आहे, जे आता प्रचंड चिघळले आहे. खरं तर, उसेन बोल्टची $१२.८ मिलियन डॉलर (सुमारे ९८ कोटी रुपये) फसवणूक झाली आहे.

बोल्टच्या गुंतवणूक खात्यातून ९८ कोटी रुपये पळून गेले. त्यांचे खाते SSL (Stocks and Securities Limited) कंपनीत होते. ही जमैकन गुंतवणूक कंपनी आहे. असोसिएटेड प्रेसने एका पत्राचा हवाला देत या प्रकरणाची माहिती दिली आहे. बोल्टच्या वकिलाने हे पत्र कंपनीला पाठवले असून, त्यात त्याचे पैसे परत करण्याची मागणी करण्यात आली आहे. वकिलाने पत्रात लिहिले आहे की, ‘हे खरे आहे, तरी आमच्या अशिलाने फसवणूक, चोरी किंवा दोन्हीचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे.’

Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
Mephedrone Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन, आरोपीला अटक
sugarcane juice selling Business
Viral Video: लय भारी जुगाड! दुकानदाराने ऊसाचा रस थंड राहण्यासाठी बिना बर्फाचा केला भन्नाट जुगाड; दुकानावर झाली गर्दीच गर्दी
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन

हेही वाचा: शुबमनच्या शानदार द्विशतकानंतर चाहत्यांनी केली साराच्या engagementची घोषणा! सोशल मीडियावरील व्हायरलमागे हे आहे तथ्य…

बोल्टला ११ जानेवारीला कळाले

बोल्टला ११ जानेवारीला पहिल्यांदा कळले की त्याचे पैसे गायब झाले आहे. यानंतर बुधवारी त्यांच्या वकिलांनी कंपनीकडून दहा दिवसांत पैसे परत करावेत, अन्यथा त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी मागणी केली आहे. आणखी एका अहवालात असे म्हटले आहे की आठ दिवसांत पैसे परत न केल्यास, बोल्ट हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेण्याची योजना आखत आहे. बोल्टच्या खात्यात $१२.८ दशलक्ष होते. जो त्याच्या निवृत्तीचा आणि आजीवन बचतीचा भाग होता. त्याचे वकील लिंटन पी. गॉर्डन यांनी सांगितले की, आता बोल्टकडे फक्त १२००० डॉलर (सुमारे १० लाख रुपये) शिल्लक आहेत. त्याच वेळी, कंपनीने या प्रकरणात कोणतेही विधान जारी केलेले नाही.

हेही वाचा: IND vs NZ: ‘हत्ती गेला अन् शेपटाने झुंजवले’, भारतीय संघाच्या बाबतील गेल्या काही सामन्यात असे का होत आहे? जाणून घ्या

उसेन बोल्टची कारकीर्द

त्याने ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण ८ वेळा सुवर्णपदक जिंकले आहे. २०१८ मध्ये, बोल्ट सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ४५ व्या क्रमांकावर होता. त्याचा पगार सुमारे १ मिलियन डॉलर होता. त्याच वेळी, त्याची जाहिरातींमधून कमाई $ ३० दशलक्ष झाली आहे. उसेन बोल्टने एकूण ३ ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला आहे. त्यादरम्यान त्याने वैयक्तिक स्पर्धांमध्ये ८ सुवर्णपदके जिंकली आहेत. एकूण 8 सुवर्ण जिंकण्यासाठी तो केवळ ११५ सेकंद धावला आहे. त्याने ११९ दशलक्ष डॉलर्सची बक्षीस रक्कम जिंकली आहे म्हणजेच प्रति सेकंद या खेळाडूने ८ कोटी रुपये कमावले आहेत.