T-20 Cricket New Records Update : पाकिस्तान सुपर लीगमध्ये दिवसेंदिवस धावांचा पाऊस पडताना दिसत आहे. आक्रमक फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीमुळं या टुर्नामेंटमध्ये अतितटीचे सामने पाहायला मिळत आहेत. याचसोबत टी-२० क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घातली जात आहे. आता उस्मान खानने पाकिस्तान सुपर लीगच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठोकलं आहे.

उस्मानने फक्त ३६ चेंडूत १०० धावांचा डोंगर रचण्याची कमाल केली आहे. उस्मानच्या या वादळी शतकामुळं क्रिकेट चाहते त्याचं भरभरून कौतुक करत आहेत. एक दिवस आधीच या टुर्नामेंटमध्ये रिले रोसौवने ४१ चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम केला होता. पण दुसऱ्या दिवशीच उस्मानने हा विक्रम मोडीत काढत नवीन इतिहास रचला.

IPL 2024 Travis Head Breaks Many Records with 89 Runs innings against Delhi Capitals
IPL 2024: ११ चौकार, ६ षटकार, २७८च्या स्ट्राईक रेटने ट्रॅव्हिस हेडने दिल्लीच्या गोलंदाजांना धू धू धुतलं! ८९ धावांच्या खेळीत अनेक विक्रम
Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Updates in Marathi
DC vs KKR : केकेआरने रचला इतिहास! सुनील नरेनच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीसमोर ठेवले २७३ धावांचे लक्ष्य
RCB vs LSG Match Updates in Marathi
IPL 2024 : क्विंटन डी कॉकच्या अर्धशतकाच्या जोरावरने लखनऊने उभारला धावांचा डोंगर, आरसीबीसमोर ठेवले तब्बल ‘इतक्या’ धावांचे लक्ष्य

नक्की वाचा – Video : मोहम्मद कैफला क्रिकेटच्या इतिहासातील बेस्ट फिल्डर का म्हणतात? ४२ वर्षांच्या कैफने हवेत उडी मारून घेतला झेल

इथे पाहा व्हिडीओ

पीएसएलच्या २८ व्या सामन्यात मुल्तान सुल्तांससाठी खेळत असलेल्या उस्मानने ४३ चेंडूवर १२० धावांची आक्रमक खेळी केली. ज्यामध्ये १२ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश आहे. उस्मानने २७९.०७ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करून गोलंदाजांचा धुव्वा उडवला. क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध उस्मानने ज्या अंदाजात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला, हे पाहून प्रेक्षकांचा मनोरंजन विश्वात एकप्रकारे महापूरच आला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

उस्मानच्या वादळी खेळीमुळं मुल्तान सुल्तांसने ३ विकेट गमावत २० षटकांत २६२ धावांचा डोंगर रचला. यानंतर क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या टीमनेही धमाका केला आणि २० षटकांत २५३ धावा केल्या. पण ८ विकेट्स गमावल्याने त्यांना हा सामना जिंकता आला नाही. मुल्तान सुल्तांसच्या संघानं क्वेटाचा ९ धावांनी पराभव केला. या सामन्यात अनेक विक्रम बनले, ज्यांनी जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे.