Records Made By Vaibhav Sooryavanshi In Debut Match: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मँस्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर पार पडला. हा सामना ऐतिहासिक ठरला. कारण १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला भारतीय संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. वैभवला गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघात स्थान देण्याची मागणी केली जात होती. अखेर संजू सॅमसनला प्लेईंग ११ मधून बाहेर करुन वैभवसाठी पदार्पणाचं दार उघडलं. या सामन्यात त्याने जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचला. पण या डावात त्याला मोठी खेळी करता आली नाही. वैभव १४ चेंडूंचा सामना करुन १० धावा करत माघारी परतला. तो मोठी खेळी करु शकला नाही, पण त्याने ३ मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. कोणते आहेत ते ३ रेकॉर्ड? जाणून घ्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकार खेचणारा सर्वात युवा खेळाडू
वैभवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ धाव घेऊन आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. सुरुवातीचे ३ चेंडू त्याने खेळून काढले. पण त्यानंतर जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर त्याने किपरच्या वरुन खणखणीत षटकार खेचला. वैभवने १५ वर्ष ९९ दिवस वय असताना, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यासह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकार खेचणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू
वैभव सूर्यवंशी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. वैभवने वय १५ वर्ष ९९ दिवस इतकं असताना भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. यासह त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. सचिनने १९८९ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध खेळताना पदार्पण केलं होतं.
पदार्पणाच्या सामन्यात विक्रमी भागीदारी
पहिल्याच सामन्यात वैभव स्वस्तात माघारी परतला. पण त्याने अभिषेक शर्मासोबत मिळून पहिल्या विकेटसाठी दमदार अर्धशतकी भागीदारी केली. दोघांनी मिळून २९ चेंडूंमध्ये ५० धावा पूर्ण केल्या. यासह तो पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतकी भागीदारी करणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.
