Vaibhav Sooryavanshi Record: वैभव सूर्यवंशीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर मोजकेच सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत तो हवी तशी कामगिरी करू शकला नव्हता. पण झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना त्याने दमदार पुनरागमन केलं. मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याने १८ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. यादरम्यान त्याने सचिन तेंडुलकरचा ३७ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडून काढला. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याला चांगली सुरुवात मिळाली होती, पण तो मोठी खेळी करु शकला नाही. तरीदेखील त्याने श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू महेला जयवर्धनेचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा अवघ्या ८ धावा करत माघारी परतला. तर वैभवने ९ चेंडूत २२२.२२ च्या स्ट्राईक रेटने १ षटकार आणि ३ चौकारांच्या साहाय्याने २२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

वैभव सूर्यवंशीचा मोठा रेकॉर्ड

वैभव सूर्यवंशीने मोठया रेकॉर्डमध्ये महेला जयवर्धनेला मागे टाकलं आहे. या खेळीच्या बळावर त्याने टी-२० क्रिकेटमधील सुरुवातीच्या ५ सामन्यांमध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेटने धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉप ५ मध्ये प्रवेश केला आहे. या खेळीदरम्यान वैभवने २११.३२ च्या स्ट्राईक रेटने ११२ धावा पूर्ण केल्या आहेत. यासह त्याने महेला जयवर्धनेला (२०१.८२) मागे टाकलं आहे. या यादीत वैभव सूर्यवंशी आता दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत भारताचा माजी फलंदाज युवराज सिंग अव्वल स्थानी आहे. युवराज सिंगने सुरुवातीच्या ५ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना २३५.०९ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली होती. तर चौथ्या स्थानी असलेल्या मोहम्मद अशरफुलने २०१.६७ धावा केल्या होत्या. तर रिचर्ड लेवीने २००.०० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली होती.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुरुवातीच्या ५ सामन्यांमध्ये सर्वोच्च स्ट्राईक रेटने धावा करणारे फलंदाज

युवराज सिंग- २३५.०९
वैभव सूर्यवंशी – २११.३२
महेला जयवर्धने – २०१.८२
मोहम्मद अशरफुल- २०१.६७
रिचर्ड लेवी- २००.००