Vaibhav Sooryavanshi Cried: आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. कोलकात्यातील इडन गार्डन्सच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडे विजय मिळवण्याची संधी होती. पण रिंकू सिंगने राजस्थानच्या तोंडचा घास पळवला. राजस्थानने पहिल्या डावात फलंदाजी करताना १५५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रिंकू सिंगने दमदार अर्धशतकी खेळी केली. हा कोलकाता नाईट रायडर्सचा पहिलाच विजय ठरला. दरम्यान हा सामना गमावताच वैभव सूर्यवंशी रडत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

वैभव सूर्यवंशी हा राजस्थान रॉयल्सचा या हंगामातील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत देखील आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने ४६ धावांची खेळी केली. हा सामना झाल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात तुम्ही पाहू शकता की, वैभव सूर्यवंशी रडताना दिसून येत आहे. त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्स संघाने क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत याग्निक येतात आणि त्याला धीर देतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

वैभवची रेकॉर्ड ब्रेकिंग खेळी

या सामन्यात वैभव सूर्यवंशीकडे अर्धशतक झळकावण्याची संधी होती. पण त्याचं अर्धशतक अवघ्या ४ धावांनी हुकलं. या खेळीदरम्यान त्याने मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. १३ डावांनंतर सर्वात जास्त षटकार मारण्याच्या रेकॉर्डमध्ये त्याने ग्लेन मॅक्सवेलला मागे टाकलं आहे. आतापर्यंत वैभवने १३ डावांनंतर सर्वाधिक ४४ षटकार खेचले आहेत. याआधी हा रेकॉर्ड ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर होता. त्याने १३ डावांनंतर ३३ षटकार खेचले होते.

राजस्थानचा विजय

या सामन्यात राजस्थानचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना १५५ धावा केल्या. राजस्थानकडून वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. तर यशस्वी जैस्वालने ३९ धावांची खेळी केली. तर शिमरन हेटमायरने १५ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. पण शेवट चांगला केला. शेवटी रिंकू सिंगने नाबाद ५३ आणि अनुकूल रॉयने नाबाद २९ धावांची खेळी केली. कोलकाताने हा सामना ४ गडी राखून आपल्या नावावर केला.