Vaibhav Sooryavanshi Received Autographed Cap By Virat Kohli: क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला असं वाटतं की, त्याने एकदा तरी विराट कोहलीला भेटावं. त्याच्यासमोर खेळताना दमदार कामगिरी करावी. कारण दिग्गज खेळाडू कधीही आपल्या कामगिरीची दखल घेतात आणि कौतुक करतात. राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यानही असच काहीसं चित्र पाहायला मिळालं. २०० हून अधिक धावांचा पाठलाग करत असलेल्या राजस्थान रॉयल्सकडून फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपली. वैभवकडे वेगवान शतक झळकावण्याची संधी होती. पण ही संधी थोडक्यात हुकली. दरम्यान सामना झाल्यानंतर विराट कोहलीने वैभव सूर्यवंशीला खास गिफ्ट दिलं.

वैभव सूर्यवंशीने आत्तापर्यंत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आहे.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध खेळताना त्याने २६ चेंडूत ७८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ८ चौकार आणि ७ षटकार खेचले. या खेळीच्या बळावर त्याने ऑरेंज कॅपवर कब्जा केला. यासह प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावला.

विराटकडून वैभव सूर्यवंशीला खास गिफ्ट

मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ताबडतोड खेळी केली होती. या खेळीनंतर हार्दिक पंड्याने त्याचं कौतुक केलं होतं. आता अर्धशतकी खेळी केल्यानंतर विराट कोहलीने देखील त्याचं कौतुक केलं. यासह भेट घेऊन त्याच्या कॅपवर ऑटोग्राफ दिला. यासह त्याने आपल्या कॅपवर “डियर वैभव वेल डन…”, असं लिहिलं आहे. वैभवने हा फोटो आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.\

वैभवचा ऑरेंज कॅपवर कब्जा, राजस्थानचा दमदार विजय

या सामन्यात वैभव सूर्यवंशीने अर्धशतकी खेळी करून ऑरेंज कॅपवर कब्जा केला आहे. याआधी ऑरेंज कॅप यशस्वी जैस्वालकडे होती. पण वैभवने २०० पेक्षा अधिक धावा करून आता ऑरेंज पटकावली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटकांअखेर ८ गडी बाद २०१ धावा केल्या होत्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून विराट कोहलीने ३२ धावा केल्या. तर कर्णधार रजत पाटीदारने सर्वाधिक ६३ धावांची खेळी केली. राजस्थान रॉयल्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०२ धावा करायच्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ध्रुव जुरेलने नाबाद ८१ धावांची खेळी केली. तर वैभव सूर्यवंशीने दमदार ७८ धावा केल्या. यासह हा सामना २ षटक शिल्लक ठेवून आणि ६ गडी राखून आपल्या नावावर केला. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.