Vaibhav Sooryavanshi T20I Manifestion: वैभव सूर्यवंशी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. वयाच्या १५ व्या वर्षी आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडून त्याने भारतीय संघात स्थान मिळवलं. यासह तो भारतीय संघात स्थान मिळवणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. इतक्या कमी वयात संघात स्थान मिळवल्यानंतर, त्याला भारतीय संघाचं भविष्य समजलं जात आहे. आता भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्ध या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या मालिकेत तो भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसून येणार आहे. दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्याआधी वैभव सूर्यवंशीने त्याचं स्वप्न काय आहे? याबाबत मोठा खुलासा केला आहे.
काय आहे वैभव सूर्यवंशीचं स्वप्न?
स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत वैभवने आपलं सर्वात मोठं स्वप्न काय आहे, याबाबत खुलासा केला. टी-२० क्रिकेटमध्ये ६ षटकार मारणं, हे त्याचं सर्वात मोठं स्वप्न आहे. तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणं हे वैभव सूर्यवंशीचं दुसरं सर्वात मोठं स्वप्न आहे. ही वैभव सूर्यवंशीची २ सर्वात मोठी स्वप्नं आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशीला काय करायचं आहे?
`१) एकाच षटकात ६ षटकार खेचणं
२) टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणं
३) क्रिकेट इतिहासातील सर्वात लांब षटकार खेचणं
४) टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक शतकं झळकावणं
५) शेवटच्या चेंडूवर संघाला विजय मिळवून देणं
६) क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम झेल घेणं.
वेस्ट इंडिजविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार का?
काही दिवसांपूर्वी झालेल्या भारत- अफगाणिस्तान टी-२० मालिकेत वैभव सूर्यवंशीला संघात स्थान दिलं गेलं होतं. पण त्याला प्लेईंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याला प्लेईंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली. पण या स्पर्धेत तो हवी तशी कामगिरी करू शकला नव्हता. या स्पर्धेतील २ सामन्यांमध्ये त्याला अवघ्या ५३ धावा करता आल्या. आता भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेत त्याला खेळण्याची संधी मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
