Vaibhav Sooryavanshi IPL awards and prize money: आयपीएल २०२६ मध्ये वैभव सूर्यवंशीने जणू धुमाकूळ घातला. जवळपास प्रत्येक सामन्यात विक्रमी खेळी, चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला, वैभवने या सीझनमध्ये अनेक ऐतिहासिक विक्रम मोडत दिग्गजांना मागे टारलं. संपूर्ण हंगामातील सर्वाधिक धावा करणाऱ्या वैभवने, यावर्षी पाच मोठे पुरस्कार जिंकून इतिहास घडवला. स्पर्धेच्या समारोप समारंभात जेव्हा पुरस्कारांची घोषणा झाली, तेव्हा एकामागून वैभव सूर्यवंशीचं नाव ऐकू येत होतं.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी वैभव सूर्यवंशी अहमदाबादमध्ये पोहोचला होता. वैभव संपूर्ण सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होता. आयपीएल २०२६ च्या पुरस्कार सोहळ्यावर वैभव सूर्यवंशीने पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. एकाच आयपीएल हंगामात पाच वैयक्तिक पुरस्कार जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला.

आयपीएल हंगामात सर्वाधिक ७७६ धावा केल्याबद्दल त्याला ऑरेंज कॅप आणि १० लाख रुपये प्रदान करण्यात आले. तसेच, संपूर्ण स्पर्धेतील त्याच्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीबद्दल त्याला १५ लाख रुपये आणि ‘स्पर्धेतील मौल्यवान खेळाडू’ ट्रॉफीही मिळाली. वैभव सूर्यवंशीला ‘सीझनचा उदयोन्मुख खेळाडू’ म्हणूनही गौरविण्यात आलं, ज्यासाठी त्याला १० लाख रुपये आणि एक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं. सीझनमध्ये सर्वाधिक ७२ षटकार मारल्याबद्दल त्याला ‘सुपर सिक्स अवॉर्ड’ ट्रॉफी आणि १० लाख रुपये मिळाले.

वैभवने संपूर्ण सीझनमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेटने धावा केल्याबद्दल त्याला ‘सुपर स्ट्राईकर ऑफ द सीझन’ म्हणूनही गौरविण्यात आलं, ज्यासाठी त्याला टाटा सिएरा कार देऊन सन्मानित करण्यात आलं. गेल्या सीझनमध्ये, ‘सुपर स्ट्राईकर’ पुरस्कार जिंकलेल्या वैभवला टाटा कर्व्ह कार मिळाली होती.

वैभव सूर्यवंशीचे अवॉर्ड्स

ऑरेंज कॅप – १० लाख
सुपर स्ट्राईकर ऑफ द सीझन – १० लाख
इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन – १० लाख
सुपर सिक्सेस – १० लाख रूपये
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीझन – १० लाख

वैभव सूर्यवंशीने आयपीएल अवॉर्ड्समधून किती लाख कमावले?

वैभव सूर्यवंशीचा या हंगामासाठीचा करार १.१० कोटी होता. त्याची फ्रँचायझी, राजस्थान रॉयल्सने, त्याला त्याच्या पूर्वीच्याच सॅलरीवर कायम ठेवलं. शिवाय, आयपीएलमध्ये प्रत्येक खेळाडू प्रति सामना ७.५ लाख कमावतो. वैभवने राजस्थानासाठी १६ सामन्यांमधून १.२० कोटी कमावले. त्याला सीझनच्या शेवटी पाच पुरस्कारांमधून बक्षीस म्हणून ५५ लाख रुपये मिळाले. त्याने तीन ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कारही जिंकले, ज्यातून त्याला प्रत्येकी ५ लाख रुपये मिळून १५ लाख रुपये मिळाले. याचा अर्थ, वैभवची या सीझनमधील एकूण कमाई ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.

वैभवने आपल्या फलंदाजीने टी-२० क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेलं. त्याने या हंगामात एकूण ७२ षटकार मारून आयपीएलच्या इतिहासात एक नवीन विक्रम केला. त्याने महान ख्रिस गेलचा ५९ षटकारांचा विक्रम मागे टाकला. तो एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक धााव करणारा अनकॅप्ड खेळाडू ठरला. तसेच, सर्वात कमी चेंडूंमध्ये १ हजार धावा पूर्ण करणारा तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण फलंदाजही ठरला.