IPL 2026 Vaibhav Suryavanshi 15 Balls Fifty: १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात वादळी सुरूवात केली आहे. आयपीएल २०२६ मधील तिसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवला जात आहे. गुवाहाटीमध्ये राजस्थानच्या घरच्या मैदानावर हा सामना खेळवला जात आहे. यंदाच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीने आपला फॉर्म दाखवत १५ चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे.
वैभवने १५ चेंडूत ४ चौकार व ५ षटकारांसह ३०५ च्या स्ट्राईक रेटने ही फटकेबाजी करत अर्धशतक झळकावलं. आयपीएलमधील हे त्याचं सर्वात जलद अर्धशतक आहे. मात्र, अर्धशतकानंतर लगेचच वैभव सूर्यवंशी बाद झाला. या खेळाडूने १७ चेंडूंमध्ये ५२ धावा केल्या. सर्फराझ खानने अंशुल कंबोजच्या गोलंदाजीवर डाईव्ह मारत एक अप्रतिम झेल घेतला.
वैभव सूर्यवंशीचं आयपीएल इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक
वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्सला दणक्यात सुरुवात करून दिली, पण त्याच्या पहिल्याच चेंडूवर असं काही घडले की सर्वच जण स्तब्ध झाले होते. वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने वैभव सूर्यवंशीला या हंगामातील पहिलाच चेंडू टाकला. अगदी पहिलाच चेंडू बाउन्सर होता आणि सूर्यवंशीचा शॉट चुकला, त्यामुळे चेंडू मिड-विकेटच्या दिशेने गेला. चेंडू हवेत उंच उडाला आणि कार्तिक शर्मा झेल टिपण्यासाठी वेळेत पोहोचला होता, पण त्याच्या हाताला चेंडू लागून पुढे पडला आणि सूर्यवंशीला पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळालं आणि त्यानंतर त्याने मागे वळून न पाहता वादळी फटकेबाजी केली.
मॅट हेन्रीच्या या एका चेंडूवर दोन चुका केल्या. क्षेत्ररक्षक कार्तिक शर्माने सूर्यवंशीचा झेल सोडला आणि त्यानंतर वेळेत चेंडू न अडवल्याने चौकार गेला. कार्तिकला चौकार थांबवण्याची संधी होती, पण त्याच्या क्षेत्ररक्षणामुळे चेंडू सीमारेषा ओलांडून गेला, ज्यामुळे सूर्यवंशीला आपलं खातं उघडता आलं.
जीवदान मिळाल्यानंतर वैभव सूर्यवंशीने चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने पुढच्याच चेंडूवर एक दणदणीत षटकार खेचला. त्यानंतर सूर्यवंशीने तिसऱ्या षटकात मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर आणखी एक षटकार मारला. सूर्यवंशीने अवघ्या ११ चेंडूत ३० धावांचा पल्ला गाठला आणि जैस्वालसह अर्धशतकी भागीदारी साकारली. त्यानंतर बाद होण्यापूर्वी जैस्वालसह त्याने ३८ चेंडूक ७५ धावांची भागीदारी रचली होती.
आयपीएल २०२५ मध्ये सूर्यवंशीने अवघ्या ३५ चेंडूंमध्ये शतक झळकावलं होतं आणि यावेळी या १५ वर्षांच्या मुलाने अवघ्या १५ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात जलद अर्धशतक आहे. तसेच, आयपीएलच्या इतिहासातील हे तिसरं सर्वात वेगवान अर्धशतक आहे. सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम यशस्वी जैस्वालच्या नावावर आहे, ज्याने २०२३ मध्ये केकेआरविरुद्ध १३ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. केएल राहुल, पॅट कमिन्स आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी १४ चेंडूंमध्ये अर्धशतकं झळकावली आहेत.
जीवदान मिळाल्यानंतर वैभव सूर्यवंशीने चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने पुढच्याच चेंडूवर एक दणदणीत षटकार खेचला. त्यानंतर सूर्यवंशीने तिसऱ्या षटकात मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर आणखी एक षटकार मारला. सूर्यवंशीने अवघ्या ११ चेंडूत ३० धावांचा पल्ला गाठला आणि जैस्वालसह अर्धशतकी भागीदारी साकारली. त्यानंतर बाद होण्यापूर्वी जैस्वालसह त्याने ३८ चेंडूक ७५ धावांची भागीदारी रचली होती.
