Vaibhav Suryavanshi Fastest Century at INDU19 vs ENGU19 Youth ODI: भारताचा १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी वादळी फॉर्मात आहे. वैभवने इंग्लंडविरूद्ध चौथ्या वनडे सामन्यात विक्रमी शतक झळकावलं आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारताच्या अंडर-१९ संघाचा वैभव विस्फोटक फलंदाज उत्कृष्ट कामगिरी करत आहे. वैभव सूर्यवंशीने चौथ्या युथ वनडे सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस पाडत शानदार फटकेबाजी केली आहे.
भारत आणि इंग्लंडच्या अंडर-१९ संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात, वैभवने आपला वादळी फलंदाजी करण्याचा सिलसिला सुरूच ठेवला. वैभवने फक्त २४ चेंडूत तुफानी अर्धशतक झळकावलं. वैभवने त्याच्या विस्फोटक खेळीत ८ षटकार लगावले आहेत.
वैभव सूर्यवंशीचं सर्वात जलद शतक (Vaibhav Suryavanshi Fastest Century)
वैभव सूर्यवंशीने अवघ्या ५२ चेंडूत १० चौकार आणि ७ षटकारांसह आपलं शतक पूर्ण केलं. वैभव सूर्यवंशीने युथ वनडेमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. सूर्यवंशीने ५२ चेंडूत शतक पूर्ण करत पाकिस्तानच्या कामराम गुलामचा ५३ चेंडूंचा विक्रम मोडला. कामराम गुलामने ५३ चेंडूत हे शतक झळकावलं होतं. वैभव सूर्यवंशी हा युथ वनडे इतिहासात सर्वात जलद शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
वैभव सूर्यवंशी शतकी खेळी करत असताना १९० च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करत होता. शतक झळकावल्यानंतरही वैभव मैदानावर कायम आहे. वैभवने विहान मल्होत्रासह १५० अधिक धावांची भागीदारी केली आहे. वैभवने इंग्लंड दौऱ्यावर आतापर्यंतच्या ४ सामन्यांमध्ये ४० अधिक धावा केल्या आहेत.
२ जुलैला नॉर्थम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात, वैभवने ३१ चेंडूत ८६ धावांची दमदार खेळी केली होती. या खेळीत त्याने नऊ षटकार आणि सहा चौकार मारले होते, ज्यामुळे भारताने ४० षटकांच्या सामन्यात ३४.३ षटकांत २६९ धावांचे लक्ष्य गाठले. हा सामना पावसामुळे ५० ऐवजी ४० षटकांचा करण्यात आला होता. त्याच्या खेळीमुळे भारतीय अंडर-१९ संघाला मालिकेत २-१ अशी आघाडी घेता आली आणि तो या सामन्याचा सामनावीर ठरला.