Rahul Dravid On Vaibhav Suryavanshi: आयपीएल २०२५ स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. राजस्थान रॉयल्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून केव्हाच बाहेर पडला आहे. संघातील सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालची बॅट चांगलीच तळपली. त्याने १४ सामन्यांमध्ये ५५९ धावा केल्या. संजू सॅमसन दुखापतग्रस्त असल्यामुळे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी रियान परागकडे सोपवण्यात आली होती. त्याने फलंदाजीत योगदान दिले पण कर्णधार म्हणून त्याला आपली छाप सोडता आली नाही.
वैभव सूर्यवंशी चमकला
राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीवर १.१० कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी या फलंदाजाला आयपीएल खेळण्याची संधी मिळाली. फलंदाजी करण्याची संधी मिळताच त्याने या संधीचं सोनं केलं. तो आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. गुजरातविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने अवघ्या ३८ चेंडूत १०१ धावांची तुफानी खेळी केली होती. त्याची ही कामगिरी पाहता, आगामी हंगामातही त्याला राजस्थान रॉयल्सकडून खेळण्याची संधी मिळणार, यात काहीच शंका नाही.
वैभवला घडवण्यात राहुल द्रविड यांचा मोलाचा वाटा आहे. १९ वर्षांखालील खेळाडूंना घडवणं यात राहुल द्रविडचा हातखंडा आहे. राहुल द्रविडने सांगितलं की, जेव्हा वैभवने विक्रमी शतकी खेळी केली त्यावेळी त्याला ५०० मिस्ड कॉल आले होते. मात्र, तरीदेखील त्याने आपलं संपूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित ठेवलं होतं. वैभव मला म्हणाला, मी शतक झळकावल्यानंतर खूप लोकांनी मला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण मला हे मुळीच आवडत नाही. मी ४ दिवस माझा फोन बंद ठेवला होते.
शतक झळकावल्यानंतर वैभवने राहुल द्रविडला आपला अनुभव सांगितला होता. राहुल द्रविड म्हणाला , “वैभवने माझ्याशी संवाद साधला. तो म्हणाला, मला ५०० हून अधिक मिस्ड कॉल आले होते. पण मी ४ दिवस माझा फोन बंद करून ठेवला होता. मला घरी माझ्या कुटुंबासोबत आणि काही मित्रांसोबत राहायला आवडतं.”
वैभव सूर्यवंशीची आयपीएल २०२५ स्पर्धेतील कामगिरी
वैभव सूर्यवंशी पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धा खेळत आहे. पहिल्याच हंगामात त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. गुजरातविरूद्ध खेळताना त्याने विक्रमी शतकी खेळी केली होती. त्याच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ७ सामन्यांमध्ये २५२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि १ अर्धशतक झळकावलं आहे.
राह