आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी काही खेळाडूंना ५ ते १० वर्षांचा कालावधी लागतो. काही खेळाडू पूर्ण आयुष्य मेहनत करूनही त्यांना हवं तसं यश मिळत नाही. पण १४ वर्षीय वैभव सू्र्यवंशीच्या बाबतीत वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत असं काहीच घडलेलं नाही. या वयात मुलं, आपल्याला आयुष्यात पुढे जाऊन काय करायचं आहे हे ठरवतात. पण वैभवने त्याच वयात असं काही करून दाखवलं आहे, जे खूप कमी लोकांना जमलं. आयपीएलच्या दुसऱ्याच सामन्यात शतक, अंडर १९ क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडून वैभवने अनेक मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. त्यामुळे आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू होण्याआधी तो तुफान चर्चेत आहे.

वैभवने वयाची १५ वर्ष पूर्ण केली आहेत. आज म्हणजेच २७ मार्चला तो १५ वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाची १५ वर्ष पूर्ण होताच वैभवचं भारतीय संघात स्थान मिळवण्याचं दार उघडं झालं आहे. त्यामुळे वैभव आता लवकरच भारताकडून खेळणार, अशी चर्चा रंगायला सुरूवात केली. वैभवने वयाच्या १४ व्या वर्षी कोटींची कमाई केली आहे. दरम्यान जाणून घ्या वैभवची नेटवर्थ.

वैभव सूर्यवंशीची एकूण नेटवर्थ किती?

वैभव सूर्यवंशीची एकूण नेटवर्थ किती, याबाबत कुठलाही अधिकृच आकडेवारी समोर आलेली नाही. सध्या तो आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. गेल्या हंगामातही तो या संघाकडून खेळताना दिसून आला होता. यासह तो भारतीय अंडर-१९ संघाचं प्रतिनिधित्व करतो. माध्यमातील वृत्तानसार, त्याची एकूण नेटवर्थ अडीच कोटींच्या घरात आहे.

वैभव सूर्यवंशी कमाई कशी करतो?

वैभव सूर्यवंशी आयपीएल २०२५ स्पर्धेत ताबडतोड फलंदाजी करताना दिसून आला होता. गेल्या हंगामात त्याच्यावर बोली लावली गेली, त्यावेळी तो अवघ्या १३ वर्षांचा होता. त्यानंतर काही दिवासंनंतर म्हणजेच, वयाच्या १४ व्या वर्षी त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली. राजस्थान रॉयल्सने त्याला १.१० कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं होतं. आयपीएल २०२६ स्पर्धा खेळण्यासाठीही त्याला १.१० कोटी रुपये मानधन दिलं जाणार आहे. यासह अंडर-१९ संघाचं प्रतिनिधित्व करत असल्याने त्याला बीसीसीआयकडूनही मानधन दिलं जातं. अंडर-१९ सामना खेळण्यासाठी वैभवला २० हजार रूपये दिले जातात. तर काही दिवसांपूर्वी अंडर-१९ वर्ल्डकप २०२६ स्पर्धेच्या जेतेपदाची ट्रॉफी जिंकल्यनंतर बीसीआयकडून बक्षिसाची रक्कम जाहीर करण्यात आली होती. त्या ७.५ कोटीपैकी वैभवला ४० लाख मिळाले होते.