India vs Pakistan Match In Asia Cup Rising Stars Cup 2025: भारत-पाक पुन्हा आमनेसामने! वैभव सूर्यवंशी उतरणार मैदानात; केव्हा, कुठे पाहता येणार सामना? भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर सुरू आहे. दर दुसरीकडे भारतीय युवा खेळाडूंना देखील आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. आजपासून (१४ नोव्हेंबर) एशिया कप रायजिंग स्टार्स २०२५ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत ८ संघ जेतेपदासाठी झुंज देताना दिसून येणार आहेत. ज्यात भारत, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान अ आणि पाकिस्तानसह ओमान, हाँगकाँग आणि यूएई या संघांचा समावेश असणार आहे.

या स्पर्धेत भारतीय अ संघाची जबाबदारी स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माकडे सोपवण्यात आली आहे. या स्पर्धेतील ८ संघांची २ गटात विभागणी केली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा ब गटात समावेश करण्यात आला आहे. भारतीय अ संघाचा पहिला सामना १४ नोव्हेंबरला यूएईविरूद्ध होणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान सामना १६ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत वैभव सूर्यवंशीवर सर्वांची नजर असणार आहे. कारण तो पहिल्यांदाच भारतीय अ संघाकडून खेळताना मोठी स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

असे आहेत दोन्ही गट

अ गट- अफगाणिस्तान अ, बांगलादेश अ, श्रीलंका अ, हाँगकाँग.

ब गट- भारत अ, पाकिस्तान अ , ओमान, यूएई.

हे सामने लाईव्ह कुठे पाहता येणार?

एशिया कप रायजिंग स्टार्स २०२५ स्पर्धेतील सामने वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम दोहा येथे खेळवले जाणार आहेत. भारताचा यूएईविरूद्ध होणारा सामना हा संध्याकाळी ५ वाजता सुरू होणार आहे. त्यानंतर पाकिस्तान आणि ओमानविरूद्ध होणारा सामना हा रात्री ८ वाजता खेळवला जाणार आहे. हे सामने तुम्ही सोनी स्पोर्ट टेन १ आणि टेन १ एचडी या चॅनेलवर लाईव्ह पाहू शकता. यासह या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमींग तुम्ही सोनी लिव अॅपवर पाहू शकता.

भारतीय संघाचा पहिला सामना १४ नोव्हेंबरला यूएईविरूगद्ध होणार आहे. त्यानंतर १६ नोव्हेंबरला भारत -पाकिस्तान सामना होणार आहे. तर १८ नोव्हेंबरला भारत आणि ओमान संघ आमनेसामने येणार आहेत. त्यानंतर २१ नोव्हेंबरला या स्पर्धेतील पहिला सामना दुपारी ३ वाजता खेळवला जाणार आहे. तर दुसरा सेमीफायनलचा सामना ८ वाजता खेळवला जाईल. तर स्पर्धेतील अंतिम सामना २३ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता रंगणार आहे.

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:

भारतीय अ संघ: जितेश शर्मा (कर्णधार/यष्टीरक्षक), नमन धीर (उपकर्णधार), प्रियांश आर्या, वैभव सूर्यवंशी, नेहल वढेरा, सूर्यांश शेडगे, रमनदीप सिंग, हर्ष दुबे, आशुतोष शर्मा, विजय कुमार वैश्य, युद्धवीर सिंग चरक, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), यश ठाकुर, गुरजापनीत सिंग,सुयश शर्मा.