Vaibhav suryavanshi World Record: १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीची अंडर-१९ विश्वचषकात बॅट तळपली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात अंडर-१९ विश्वचषक २०२६ मधील अंतिम सामना खेळवला जात आहे. हा अंतिम सामना हरारेमधील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जात आहे. या सामन्याची नाणेफेक जिंकत टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि यादरम्यान वैभवने दमदार शतक पूर्ण केलं. ८ ८ ५५
वैभव सूर्यवंशी व आरोन जॉर्जच्या जोडीने फलंदाजीला सुरूवात केली. पण आरोन चौथ्या षटकात झेलबाद झाला. यानंतर वैभव सूर्यवंशीने आयुष म्हात्रेच्या जोडीने संघाचा डाव सावरला. आयुष म्हात्रेने ५० चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं व तो झेलबाद झाला. वैभव सूर्यवंशी व आयुष म्हात्रे यांनी ९० चेंडूत १४२ धावांची उत्कृष्ट भागीदारी रचली. तत्पूर्वी वैभव सूर्यवंशीने ३२ चेंडूत त्याचं अर्धशतक पूर्ण केलं होतं. वैभव सूर्यवंशाने या सामन्यात ८० चेंडूत १५ चौकार व १५ षटकारांच्या मदतीने १७५ धावांची वादळी खेळी केली.
वैभव सूर्यवंशीने अंडर-१९ विश्वचषकात सर्वाधिक षटकारांचा विक्रम केला आहे. या सामन्यापूर्वी, वैभव सूर्यवंशीने २०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात १६ षटकार मारले होते आणि एका १९ वर्षांखालील विश्वचषक आवृत्तीत सर्वाधिक षटकार मारणारा तो इतिहासातील दुसरा खेळाडू बनला होता. पण अंतिम सामन्यातील खेळीत त्याने १३ षटकार लगावत एका खेळीत सर्वाधिक षटकार लगावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्याने केला आहे.
१९ वर्षांखालील विश्वचषकाच्या एका डावात सर्वाधिक षटकार
१५* – वैभव सूर्यवंशी (भारत) विरुद्ध इंग्लंड, हरारे, २०२६
१२ – मायकेल हिल (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध एनएएम, पेनांग, २००८
११ – क्रेग सिमन्स (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध केईएन, ड्युनेडिन, २००२
सूर्यवंशीने आता युवा एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार लगावले आहेत, त्याने डिसेंबरमध्ये आयसीसीए दुबई येथे युएई अंडर-१९ विरुद्ध स्वतःचा सर्वाधिक १४ षटकारांचा विक्रम मागे टाकला आहे.
वैभव सूर्यवंशीने एकाच खेळीत केले ५ मोठे वर्ल्ड रेकॉर्ड
१. वैभव सूर्यवंशी हा १९ वर्षांखालील विश्वचषक अंतिम सामन्यात शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
२. वैभव सूर्यवंशीच्या नावावर १९ वर्षांखालील विश्वचषक अंतिम सामन्यात सर्वात जलद शतक करण्याचा विश्वविक्रम आहे.
३. वैभव सूर्यवंशी हा १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे.
४. वैभव सूर्यवंशी हा १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे.
५. वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० षटकार मारण्याचा विश्वविक्रम केला आहे. हा पराक्रम करणारा तो पहिला खेळाडू आहे.
कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ अंडर-१९ विश्वचषकामध्ये अपराजित राहिला आहे. गट टप्प्यात एकही सामना न गमावता संघ सुपर-६ टप्प्यात पोहोचला. त्यानंतर सुपर-६ टप्प्यात पाकिस्तान व झिम्बाब्वेचा पराभव करत टीम इंडियाने सेमीफायनल गाठली. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने विश्वविक्रमी रन चेस करत अफगाणिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आणि अंतिम सामना गाठला.

