बॅडमिंटन : वैष्णवी भालेला जेतेपद

महिला दुहेरीत संयोगिता घोरपडे आणि मेघना जे जोडीने जेतेपदाची कमाई केली.

बरेली, उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या राधेशाम गुप्ता स्मृती अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत नागपूरच्या वैष्णवी भालेने जेतेपदावर नाव कोरले. अंतिम लढतीत वैष्णवीने महाराष्ट्राच्याच नेहा पंडितवर २१-१९, १८-२१, २१-१७ असा विजय मिळवला. पुरुष गटात आदित्य जोशीने मुंबईकर हर्षील दाणीचा २१-१५, २१-७ असा धुव्वा उडवला. मिश्र दुहेरीत ठाण्याच्या जिष्णू सन्यालने शिवम शर्माच्या साथीने खेळताना रोहन कपूर आणि सौरभ शर्मा जोडीला २१-१७, २१-१४ असे नमवत जेतेपदावर कब्जा केला. मिश्र दुहेरीत हेमांगद्रा बाबू टी आणि अपर्णा बालन जोडीने तर महिला दुहेरीत संयोगिता घोरपडे आणि मेघना जे जोडीने जेतेपदाची कमाई केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Vaishnavi bhale won title in badminton