सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या विदर्भाला त्यांच्या धडाकेबाज कामगिरीसाठी रोख रकमेचं इनाम घोषित करण्यात आलं आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनने ३ तर बीसीसीआयने विदर्भासाठी २ कोटी रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं आहे.

अवश्य वाचा – विदर्भ संघ रणजी स्पर्धेत विजयी हॅट्ट्रिक साधेल

अंतिम फेरीत विदर्भाने सौराष्ट्रावर ७८ धावांनी मात करत सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. पहिल्या हंगामात विदर्भाने दिल्लीवर मात करुन आपलं पहिलं विजेतेपद मिळवलं होतं. रणजी करंडकानंतर विदर्भाच्या संघासमोर आता इराणी करंडकाचं आव्हान असणार आहे.

अवश्य वाचा – रणजीच्या विजेतेपदाचाच ध्यास होता -पंडित